जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवार यांच्या ‘सृजन’ व्यासपीठाच्या माध्यमातून दिवाळीनिमीत्त राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

१ ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ही स्पर्धा संपूर्ण ऑनलाईन स्वरुपात मुख्य स्पर्धा व मुक्तछंद या दोन गटात पार पडणार आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना भरघोस रोख रकमेची बक्षिसे मिळणार आहेत. स्पर्धकांनी तयार केलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती व्हिडीओच्या माध्यमातून पाठवता येतील.
ADVERTISEMENT 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/Durgraj2021 या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल, तसेच स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9696330330 या क्रमांकावर संपर्क करता येईल. पुणे, मुंबई, नाशिक, कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात हि स्पर्धा होणार आहे.