जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
समाजासाठी अहोरात्र झटणारे उन्ह, वारा व पाऊस याची तमा न करता रात्रंदिवस काम करणारे पोलीस बांधव व पत्रकार यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे या उदात्त हेतूने देशासाठी सैनिक तयार करणारे व समाजाच्या चांगल्या आरोग्याची तळमळ असणारे शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी पोलीस व पत्रकारांसाठी शिवनेरी हेल्थ क्लब मध्ये मोफत व्यायामाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे तेव्हा या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले आहे.
ADVERTISEMENT 

समाजासाठी हमेशा झटणारे भर उन्हात पावसात बदलत्या प्रत्येक वातावरणात संकटा समयी 24×7 आपली ड्युटी बजावणारे मागील दोन वर्षात कोरोनाच्या महा भयंकर महा मारीत स्वतः जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र आपली ड्युटी खंबीरपणे करणारे पोलीस व पत्रकारांसाठी
ADVERTISEMENT 

जामखेड पोलिस स्टेशन मधील आपले सर्व पोलीस कर्मचारी बांधव त्याचप्रमाणे आपल्या लेखणीतून वैभव निर्माण करणारे असे सर्व पत्रकार बांधव आपण जनतेसाठी समाज एकत्रित करण्यासाठी हमेशा अहोरात्र झटतात परंतु आपल्या वैयक्तिक आरोग्यासाठी आपणास बिलकुल वेळ मिळत नाही या अनुषंगाने आपण येथून पुढे 1 नोव्हेंबर 2021 या दिवसापासून लाईफ टाईम आपण आपल्या आरोग्यासाठी शिवनेरी हेल्थ क्लब( बीड रोड)मध्ये विनामूल्य सेवा व्यायामास दिली जाईल टाईम स.05.30 ते 08.00 व सं.5.00 ते 8.00 हीच आपणास दिवाळीची गिफ्ट आहे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.
तसेच जास्तीत जास्त पोलीस व पत्रकार बांधवांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे संचालक व शिवनेरी हेल्थ क्लबचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले आहे.