आमदार आपल्या दारी- अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर संवाद व चर्चा मुळे जाग्यावर प्रश्न सुटतात – आमदार रोहीत पवार 

0
238
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट ) 
सर्वसामान्य जनता, शेतकरी यांचे असलेले प्रश्न, अडचणी जाग्यावर सोडविण्यासाठी व त्यांचा अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर संवाद व चर्चा होऊन ९० टक्के प्रश्न मार्गी लागले आहे. त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील जिल्हा परिषद गटात राबवीत असलेला आमदार आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी झाला असल्याचा दावा आ. रोहीत पवार यांनी केला.        तालुक्यातील हळगाव व राजुरी येथे आमदार आपल्या दारी या योजनेत. रोहीत पवार यांच्या उपस्थितीत महसूल, पंचायत समिती, महावितरण, भुमीअभिलेख, पोलीस स्टेशन या विभागातील जनता व शेतकरी यांची बैठक झाली यावेळी आ. रोहीत पवार यांनी कोरोना काळात मृत पावलेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी व त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चलावा यासाठी विजेवर चालणारी शिलाई मशीन, पीठ गिरणी ५७ कुटुंबाला कर्जत जामखेड इंटिग्रेटेड संस्थेच्या मार्फत वाटप करण्यात आले.
      यावेळी नागरिकांनी लाईट, रस्ता अडवणे, पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्ते, विज ट्रिप होणे, धोकादायक वर्गखोल्या, ऊसतोड मजूरांच्या मुलांना वसतीगृह, व्यायाम साहीत्य, दलीत वस्ती निधी, ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, पंचनामा आदी प्रश्न चर्चेला आले. आ. रोहीत पवार यांनी या सर्व प्रश्न प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी देऊन याबाबत त्वरीत उत्तर मिळाले यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
   आ. रोहीत पवार म्हणाले, जनतेचे प्रश्न जागीच सुटत असल्यामुळे प्रशासनावरील ताण कमी होतो व नागरिकांच्या समस्या सुटल्यामुळे समाधान मिळते. यावेळी प्रांताधिकारी अजि थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, महावीतरण कार्यकारी अभियंता कैलास जमदाडे आदी उपस्थित होते.
    जाग्यावरच जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here