टाटा समूहात सामील होताच एअर इंडियाने दिला मंत्री-अधिकाऱ्यांना झटका!!! 

0
215
जामखेड न्युज – – – – 
     हजारो कोटींचे कर्ज आणि कार्यपद्धतीत आलेल्या आळसाला दूर करण्यासाठी टाटा समूहाने शिस्तबद्ध सुरुवात केली आहे. पहिल्याच निर्णयाने टाटा समूहाने केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना जबर झटका दिला आहे. एअर इंडियाने मंत्री आणि अधिकाऱ्यांची उधारीच बंद केली आहे. यापुढे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आता एअर इंडियाने प्रवास करताना क्रेडीट फॅसिलिटी मिळणार नाही. तशा प्रकारचे निवेदन अर्थ मंत्रालयाने जारी केलं आहे._
उधारीचा डोंगर वाढला
एअर इंडियाने २००९ पासून भारत सरकारचे मंत्री आणि अधिकारी यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासासाठी क्रेडीट फॅसिलिटी उपलब्ध करून दिली होती. प्रवासानंतर तिकिटाची रक्कम एअर इंडियाला सरकारकडून काही दिवसांनी अदा केली जात असे. मात्र मागील काही वर्षीत या उधारीचा प्रचंड डोंगर वाढला. ज्यामुळे एअर इंडियाला तोटा देखील झाला होता.
एअर इंडियाची १८००० कोटींना खरेदी
 नुकताच एअर इंडियाचा लीलाव करण्यात सरकारला यश आले. टाटा समूहाने एअर इंडियाची १८००० कोटींना खरेदी केली आहे. याबाबत दोन्ही बाजूने कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. टाटा समूह सुशासन, शिस्तबद्धता आणि दर्जा यावर चालतो. मागील १०० वर्षांत टाटा समूहाने भारताच्या औद्योगिक विकासात आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे एअर इंडियाला पुन्हा गतवैभव मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
मंत्री-अधिकाऱ्यांना झटका
टाटा समूहाने पूर्ण ताबा मिळवल्यानंतर एअर इंडियाच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना उधारीने प्रवास बंद करण्यात आला आहे. त्याबाबत अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून ज्यात मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना एअर इंडियाने हवाई प्रवास करण्यासाठी रोखीने तिकिटे खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here