जामखेड न्युज – – – –
शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या लगत असलेल्या बाथरूम मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही व्यक्ती कोण आहे याबाबत अजून उलगडा झालेला नाही.
या बाथरूमचा वापर तुरळक होतो. परिसरात दुर्गंधीचा वास येऊ लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. गळफास घेतलेला इसम साधारण३५ ते ४० वर्षाचा असावा. लुंगीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती असून घटनास्थळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक शिंदे यांनी भेट दिली आहे. साधारण दोन दिवसां पूर्वी हा प्रकार घडला असावा अशी शक्यता असून कोतवाली पोलीस पुढील चौकशी करत आहेत.






