जामखेड न्युज – – – –
राज्यात इतरत्र कोरोनाची लाट ओसरत रुग्णसंख्या नगण्य असली तरी नाशिक विभागात मात्र कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे नगर, नाशिक, जळगाव, धुळे,नंदुरबार या जिल्ह्यात नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी फटाक्यास बंदीचे निर्देश जारी केल्याचे वृत्त आहे. फटाक्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय.
नगर जिल्ह्याचा विचार करता सध्याही काही गावांत पूर्ण लॉकडाऊन लावावा लागलेला आहे. संगमनेर, पारनेर आदी तालुक्यातील रुग्णसंख्या ही जास्तीची आहे. गेल्या काही दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने कमी होताना दिसून येत असली तरी प्रशासन सणानिमित्ताने होणारी गर्दी आणि त्यातून रुग्णसंख्या पुन्हा वाढीचा धोका नको म्हणून काळजी घेताना दिसून येत आहे. इतर विभागानं पेक्षा नाशिक विभागात आज मितीसही तुलनात्मक अधिक आहेत. तिसरी लाट आली तर ती नाशिक विभागातील नगर जिल्ह्यातून होऊ शकते अशी शक्यता विभागीय आयुक्तांनी मध्यंतरी नगर मध्ये बोलून दाखवली होती.






