जामखेड न्युज – – –
केंद्र सरकारकडून 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लहान मुलांना सुद्धा कोरोना पासून दूर ठेवण्यात मोठी मदत होणार आहे. कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे वर्तविण्यात आलं आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरणसुद्धा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
DCGI ने कोव्हॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडून या वयोगटातील मुलांसाठी लशीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच ही स्वदेशी लस मुलांना दिली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 12 वर्षांवरील मुले आणि कोविड कंडिशन असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जाईल. मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे. दरम्यान कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोव्हॅक्सीन सुमारे 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
– आता लहान मुलांनाही मिळणार कोरोनाची लस
– 2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी
– मुलांच्या लसीकरणाला DCGIची परवानगी
– मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा
यासंदर्भात केंद्र सरकारकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील असे कळले आहे. असे सांगितले गेले आहे की, मुलांना प्रौढांप्रमाणे कोव्हॅक्सीनच्या दोन लसही मिळतील. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये, लसीच्या मुलांना कोणतेही नुकसान झाल्याची चर्चा झालेली नाही.






