जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – -(सुदाम वराट)
आमदार रोहित पवार यांच्यासारख्या कर्तृत्वान मुलाला जन्म देवून त्यास सुसंस्कृत केले. दोन वर्षांच्या आमदारकीच्या काळात आ. पवार यांनी मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर विकास कामे मार्गी लावली. तसेच स्वराज ध्वजामुळे तर मतदारसंघाचे नाव देश – पातळीवर पोहचले. या ऋणातून काही प्रमाणात उतराई व्हावे म्हणून पं. स. सभापती राजश्रीताई मोरे व सुर्यकांत मोरे यांनी सुनंदाताई पवार यांची पेढेतुला केली. या सोहळ्यामुळे सुनंदाताई पवार यांना गहिवरून आले. त्यांनी आनंदआश्रुला वाट मोकळी करून दिली यामुळे उपस्थित भावूक झाले होते.
तालुक्यातील देवदैठण येथे आ. पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांचा पेढेतुला कार्यक्रम पंचायत समिती सभापती राजश्री मोरे व सुर्यकांत मोरे दाम्पत्याने अयोजीत केला होता. यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या पंचायत समिती सभापती मोरे व सूर्यकांत मोरे या दाम्पत्यांनी माझी पेढेतुला कार्यक्रम करण्याचा प्रस्ताव माझ्यापर्यंत पोहचला. तो माझ्या स्वभावाच्या पूर्ण विरोधात होता. पण मला त्यांच्या भावना, त्यांचा आदर करायचा होता म्हणून मी दोन पावले माघारी घेतले. मला या गोष्टी पासून दूर रहायला आवडते.
रोहीत या भागात येणे व आम्ही दोघांनी त्याला परवानगी देणे, माझे स्वतःचे कुटुंब कोणीच राजकारणात नव्हते. माझ्या सास-यापासून आम्ही समाजसेवेत होतो. राजकारण विषय कधीच नव्हता. हा मुलगा लहान असल्यापासून तर आत्तापर्यंत दोन मुलांचा बाप होईपर्यंत या लेकराने आईबाप म्हणून जी काळजी असते ती कधीच लावली नाही. जे आहे ते ओरीजिनल आहे. देवाचा प्रसाद आहे. फक्त परमेश्वराने माझी कुस वापरली यातच माझे समाधान आहे, असे मनोगत सुनंदाताई यांनी व्यक्त करताना त्यांना भावना अनावर झाल्या व डोळ्यातून आनंदआश्रुला वाट मोकळी करून दिली.
यावेळी सभापती मोरे दांम्पत्य, सुनंदाताई पवार यांच्या सहकारी सविता व्होरा, माजी सभापती सुभाष आव्हाड, माजी पं.स.सदस्य विजयसिंह गोलेकर, ह. भ. प. कैलास महाराज भोरे, सुशिल आव्हाड, सरपंच हर्षा महानवर, उपसरपंच अनिल भोरे, मनोज भोरे, अशोक धेंडे, देवदैठन सेवा संस्थेचे अध्यक्ष महादेव भोरे, बापुसाहेब शिंदे, बजरंग भोरे, शैलेंद्र मोरे, चरण कदम, नितीन बुचूडे, संतोष कात्रजकर, विलास मोरे, मुबारक सय्यद, भैरवनाथ काळे, योगेश माने, उमेश मोरे, निवास वारे ,पप्पू वारे, प्रसाद मोरे, बिबीशन मोरे, विजय साठे ,मोहन बनकर, लक्ष्मण साठे, विजय धेंडे, परशुराम साठे, शिवमुर्ती मोरे, बाळासाहेब मोरे, सूनील मोरे, अमोल मोरे, अविनाश मोरे, दत्ता मोरे, खंडू धेंडे, दादा जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.