जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज तालुक्यातील खर्डा (शिवपट्टण) किल्ल्यासमोर विजयादशमीच्या मुहूर्तावर फडकणार आहे त्या ध्वजाचे पुजन कर्जत-जामखेड मधील २२० गावांमधे होणार आहे आज सकाळी साकत मध्ये मोठ्या भक्तिभावाने माता भगिनींनी कलश घेऊन तर तरूणांनी लेझीम व सनईच्या वाद्यवृंदानी स्वागत करत भक्ती भावाने पुजन करण्यात आले.
यावेळी आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, सविता व्होरा, सरपंच मनिषा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हनुमंत पाटील, माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव वराट, राजू वराट, विठ्ठल वराट, गणेश वराट, डॉ. सचिन मुरुमकर, याच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुनंदाताई पवार म्हणाल्या की, स्वराज्य ध्वजामुळे कर्जत-जामखेडचे नाव देशात पोहचले आहे. कर्जत-जामखेडची जनता ही सर्वच या कार्यक्रमाची आयोजक आहे. हा कार्यक्रम राजकीय नाही आपल्या सर्वांचा घरचा कार्यक्रम आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर स्वराज्य ध्वज फडकणार आहे.