जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कर्जत-जामखेडचे नाव देश-पातळीवर आमदार रोहित पवारांच्या कार्य-कर्तृत्वामुळे पोहचले आहे असे आमदार म्हणजे मतदारसंघाचे भाग्य आहे व या पुत्राचा जन्म ज्या मातेच्या पोटी झाला त्या मातेचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य समजतो
मातेचे ऋण फेडण्यासाठी व स्वराज ध्वज पुजनच्या निमित्ताने आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांचे पेढे तुला कार्यक्रम पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे व सुर्यकांत मोरे परिवाराच्या वतीने करण्यात आला.

ह. भ. प. कैलास महाराज भोरे यांच्या हस्ते पेढे तुला करण्यात आले यावेळी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, सुर्यकांत मोरे, त्यांच्या मातोश्री पार्वती मोरे,
सुनंदाताई पवार यांच्या सहकारी सविता व्होरा, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष आव्हाड, सुशिल आव्हाड, विजयसिंह गोलेकर, देवदैठणचे सरपंच हर्षा महारनवर, उपसरपंच अनिल भोरे, युवा नेते मनोज भोरे, अशोक धेंडे, महादेव भोरे, बजरंग भोरे, शैलेंद्र मोरे, चरण कदम, संतोष कात्रजकर, बाळासाहेब डुचे, नितीन बुचुटे, प्रसाद मोरे, भैरवनाथ काळे, बाळासाहेब काकडे, मुबारक सय्यद, किरण मोरे, विलास मोरे, योगेश माने, गणेश भोरे, अक्षय मोरे, उमेश मोरे, बिभिषण भोरे, सुनिल भोरे, खंडू धेंडे, अविनाश भोरे, दत्ता भोरे, बाळासाहेब धेंडे, दादाराव जाधव राऊत सर मुख्याध्यापक देवदैठण यांच्या सह अनेक ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुर्यकांत मोरे म्हणाले की, आपल्या मतदारसंघाला रोहित पवार आमदार लाभले हे आपले भाग्य आहे. आमदारांनी आपल्या मतदारसंघाची ओळख देश-पातळीवर नेलेली आहे अशा पुत्राला जन्म देणाऱ्या मातेचा सन्मान करणे तिचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून मोरे कुटुंबीयांच्या वतीने खंडेरायाच्या पद- स्पर्शाने पावन असलेल्या देवदैठण येथे स्वराज ध्वज पूजन व मातोश्री सुनंदाताई पवार यांचा पेढे तुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पेढे तुला कार्यक्रमाबद्दल बोलताना सुनंदाताई पवार यांना अश्रू अनावर झाले. आपल्या पुत्राच्या चांगल्या कामामुळे मातेचा सन्मान होत आहे. यात मला खुपच समाधान आहे. मला कधीच असे कार्यक्रम आवडत नाहीत काम करणे आवडते पण मोरे कुटुंबीयांच्या भावना लक्षात घेऊन मी तयार झाले. आमचे कुटुंब राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देते. रोहित जे काम करत आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.