जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
मंगळवार दि. २८ रोजी ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत आजपासून नियोजनानुसार सुरू केली आहे. आज पुस्तक वाटप करताना प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावे, हात स्वच्छ धुवावे आणि अतिशय आनंदामध्ये अभ्यासास चांगली सुरुवात करावी असे सांगितले,
यावेळी उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपप्राचार्य पोपट जरे, पर्यवेक्षक रमेश आडसूळ, समारंभ प्रमुख संजय कदम, ग्रंथपाल संतोष देशमुख आणि महिला शिक्षिका श्रीमती संगीता दराडे, श्रीमती सुप्रिया घायतडक, श्रीमती वंदना अल्हाट,श्रीमती पूजा भालेराव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंग ठेवून पुस्तक वाटप करण्यात आले.
पुस्तक घेताना इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदाच्या भावना दिसून येत होत्या अतिशय उत्साहाने ते आपापले पुस्तकांचे बंच घेत होते. विद्यार्थ्यांचे पालक हे उपस्थित होते त्यांच्याही चेहऱ्यावर एक आनंदाची भावना होती.
एकदम गर्दी होऊ नये यासाठी आज पासून दररोज एक दिवस नवीन इयत्ता पुस्तक वाटप केले जाणार आहे.म्हणजे एक दिवस पाचवी एक दिवस सहावी एक दिवस सातवी एक दिवस आठवी याप्रमाणे पुस्तक वाटप होणार आहे तशा सूचना विद्यार्थ्यांना शालेय व्हाट्सअप ग्रुप वरून दिल्या जातात मग विद्यार्थी या दिवशी हजर राहून आपली पुस्तके घेऊन जातात.