जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सुचानाचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रधीकारानातर्फे तालुक्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, प्रशासनाने दिलेल्या सुचानाचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. नदी,ओढे व नाल्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे.तसेच पाणी पातळीत वाढ होता असताना नागरिकांनी नदी, ओढे, नाले यापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलंतरीत व्हावे. नदी अथवा नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये.पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. धोकादायक झालेल्या तलावांच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.धरण व नादिक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी चढू नये,धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.मेघगर्जना होत असताना झाडाखाली अथवा विद्यूतवाहिनी जवळ थांबू नये. आपत्कालीन परिस्थितीत तहसिल कार्यालय नियंत्रण कक्षात संपर्क करावा .