जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोना प्रादुर्भाव, कधी पाऊस, अतिवृष्टी, महापूर, वातावरणातील बदल आदी कारणाने शेतीमालाला भाव मिळलाच नाही. दोन वर्षात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना खरिप हंगामातील सोयाबीन या हुकमी उत्पादन मिळवून देणारी पिकावरच मदार होती. सोयाबिनला दर इतिहासात प्रथमच सोयाबीन दर मुहूर्तालाच ११ हजारापर्यंत गेले होते. पण आता साडेचार ते पाच हजार रुपये झाले आहे यातच अतिवृष्टीने सोयाबीन पीक पाण्यात आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनचे भाव घसरले आहेत.

शेतकऱ्यांची सध्या सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे. सोयाबीन काढणीस सुरुवात झाल्याने दर निम्म्याने खाली उतरल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा आर्थिक संकट उभे राहिले आहे. जर सोयाबीन दर निम्म्याने कमी केले आहेत तर खाद्यतेलाचे दर निम्म्याने कमी का केले नाहीत, असाही प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
टोमॅटो, मिरची यासह भाजीपाला दरात घसरण झाल्याने सोयाबीनला तरी हमीभावाच्या दुप्पट दर्शन मिळण्याची आशा होती. सोयाबीन दरात जर निम्म्याने कमी होतात तर खाद्यतेलाचे दर ही निम्म्याने कमी का केले जात नाहीत. शेतमालाचे भाव पाडले जातात तर खाद्यतेलाचे भाव का पडले नाहीत. असाही प्रश्न शेतकन्यांमधून उपस्थित केले जात आहे.
जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने खरिप हंगामातील सोयाबीन भुईमूग, कडधान्य पिके, ऊस या पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर सोयाबीनला शेंगा भरण्याच्यावेळी पावसाने दडी मारली होती. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. सोयाबीनचा उतारा घटल्याने शेतकऱ्यांना वाढलेल्या दरावरती आशा होत्या. मात्र, दरातही घट झाल्याने शेतकन्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे मात्र गेल्या दहा दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. सध्या तर गुलाबी चक्रिवादळाचा मोठा प्रादुर्भाव घाटमाथ्यावर जाणवत आहे. अनेकांचे सोयाबीन पाण्यात आहे तर काही लोकांनी सोयाबीन काढले व पाऊस सुरू झाला पाण्यात मुठी आहेत अनेकांचे सोयाबीन नदीत तर काही शेतकऱ्यांचे तळ्यात वाहुन गेले आहे. नैसर्गिक संकटाबरोबरच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या शेतकरी मोठय़ा आर्थिक अडचणीत आहे.