जामखेड प्रतिनिधी
गेल्या ३५ वर्षापासून बंद पडलेला बाजार सुरू करून सर्व सामान्य जनतेची सोय केली तसेच पाच वर्षांत रस्ते, वीज व पाणी याबाबत गावाला स्वयंपूर्ण बनविले, बसस्थानक बनविले केलेल्या विकास कामांमुळे व जनतेच्या आग्रहाखातर परत मातोश्री उमेदवारी करत आहे. व जनतेचा पाठिंबा पाहता बहुमताने निवडून येणार असा विश्वास समीर मद्देखान पठाण यांनी सांगितले.

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी पाटोदा ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभाग दोन मधुन लोकांच्या आग्रहाखातर चांदबी मद्देखान पठाण या उमेदवारी करत आहेत व पाच वर्षांत केलेल्या विकास कामांमुळे व जनतेच्या पाठिंब्याने प्रचंड बहुमताने निवडून येणार असा विश्वास समीर मद्देखान पठाण यांनी व्यक्त केला. कारण आम्ही जनतेचे सालकरी म्हणून जनतेची सेवा करत आहोत. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाहीत यामुळे परत आम्हाला जनतेनी आग्रह धरला व उमेदवारी करावयास लावली.
यावेळी डॉ. शिंदे पाटील, विलास कवादे पाटील, शुभम कोहकडे, जगन्नाथ कवादे पाटील, आकाश कवादे पाटील, सत्तार भाई पानसरे, अन्सार पठाण, बंडू गव्हाणे, आण्णा कात्रजकर, शेखर कडू, अल्ताफ सय्यद, सोहेल सय्यद, इस्माईल सय्यद, सादिक पठाण, मेघराज शहा, नानाभाऊ गव्हाणे, दत्तात्रय कापसे, मच्छिंद्र लंघे, कृष्णा राऊत, भैय्या थोरात, शौकत पठाण, मल्हारी वाघमोडे, मुजीब पठाण, अफसर पठाण, प्रविण टाफरे, हनिफ पठाण, प्रविण शिकारे, सुनील सुरवसे, बापू येवले, अलीम पठाण यांच्या सह अनेक मान्यवर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.