आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख ठरली, आरोग्यमंत्र्यांनी केली घोषणा!!

0
204
जामखेड न्युज – – – 
आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा  25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. आता ही आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचं आणि पैशांचंही नुकसान झालं होतं. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत लवकरच नवी तारीख जाहीर करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. जर आणि तर आरोग्यमंत्र्यांनी सध्या दोन वेगवेगळ्या तारखांच्या शक्यता व्यक्त केल्या आहेत. 15 आणि 16 तारखेला रेल्वेची पूर्वनियोजित परीक्षा आहे. ही परीक्षा पुढे ढकलून आरोग्य विभागाची परीक्षा प्राधान्याने घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे पुन्हा या परीक्षेची तारीख जर-तर वर अवलंबून असल्याचं चित्र आहे.
जर रेल्वेची परीक्षा पुढे ढकलता आली, तर 15-16 तारखेला आरोग्य विभागाची परीक्षा होईल. जर रेल्वेची परीक्षा पुढं ढकलणं शक्य झालं नाही, तर मात्र 22-23 तारखेला परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here