कृषी दुत प्रतिक कुंभारचे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञान हस्तांतर मार्गदर्शन

0
200
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत सौ. के एस. के. ऊर्फ काकू कृषी महाविद्यालय, बीड येथील कृषीदूत प्रतिक राजू कुंभार ह्याने जामखेड तालुक्यातील खुरदैठण गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतर व्हावे, तसेच ग्रामीण भागात विकास साधता यावा या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीतून तसेच गट चर्चेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
                   विद्यार्थ्याने शेतकऱ्यांना कार्यक्रमाअंतर्गत ऊर्जारहित शित कक्षाची रचना (झेरो एनर्जी कूल चेंबर) व त्याचा उपयोग फळे व भाजीपाला साठवण्यासाठी होतो याची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना माती परीक्षण, शेतीमालाची विक्री करण्यासाठी विविध मोबाईल ऍपचे वापर व त्याचे फायदे, सेंद्रिय शेती, एकात्मिक तण, कीड व रोग व्यवस्थापन, बोर्डो मिश्रण, चारा प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामिण जागरूकता, कृषि कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ. के एस. के ऊर्फ काकू कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. शिंदे, ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे प्रभारी प्रा. बी.डी. तायडे, डॉ.मोरे, डॉ. चव्हाण मॅडम, प्रा.डि.एस. जाधव, प्रा. एस. टी. शिंदे, प्रा.एस. पी. शिंदे, प्रा. बी. बी. तांबोळकर, प्रा. बी. आर. चादर मॅडम, प्रा. एस. व्ही. राठोड, प्रा. एस. एस. राठोड, प्रा. पी. बी. मांजरे, प्रा. बी. डी. बामणे यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. या प्रात्यक्षिकातुन मिळालेल्या माहिती बद्दल खूरदैठण गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here