जामखेड प्रतिनिधी
पिंपखेड हसनाबाद ग्रामविकास पॅनल विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहोत. मागील आठ वर्षांच्या काळात रस्ते, वीज व पाणी याबाबत गावाला स्वयंपूर्ण बनविले या निवडणुकीसाठी आम्ही समाजमान्य स्वच्छ चारित्र्य असणारे उमेदवार दिले आहेत लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत. असे पॅनल प्रमुख बापुराव ढवळे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ढवळे म्हणाले की, आम्ही गेल्या आठ वर्षांपासून गावात गावात रस्ते, वीज व पाणी तसेच जलयुक्त शिवार योजनेत मोठय़ा प्रमाणावर कामे केल्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आमचे सर्वच्या सर्व आकरा उमेदवार निवडून येणार आहेत.
यावेळी बोलताना नजीरभाई म्हणाले की, आमची ग्रामविकास आघाडी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहे. आमचे उमेदवार गावाने ठरवलेले आहेस. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहोत समोरचे ठोकशाही दहशत करत आहेत. आम्ही दहशतीला भीक घालत नाही. विघ्नसंतोषी लोक विकासात खोडा घालतात आम्ही जनतेला विश्वासात घेऊन विकास कामे मार्गी लावतोत. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार आहेत.

प्रचार फेरीला ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिसत होता. याच बळावर ग्रामविकास पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार आहेत. असा विश्वास बापुराव ढवळे यांनी सांगितले.