संस्थेच्या माजी विद्यार्थाकडून संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५,०००/- हजार रुपये देणगी प्रभाकर रामकृष्ण देशमुख यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक

0
115

जामखेड न्युज——-

संस्थेच्या माजी विद्यार्थाकडून संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५,०००/- हजार रुपये देणगी

प्रभाकर रामकृष्ण देशमुख यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रभाकर रामकृष्ण देशमुख, पुणे यांनी संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेस रुपये ७५०००/- देणगी स्वरुपात देऊन आपले विद्यार्थी कर्तव्य केले आहे.

१९५८-५९ मध्ये एस एस सी बॅचचे असलेले विद्यार्थी तत्कालीन नाव जनता विद्यालय यांनी संस्थेविषयी, शाळेविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करताना संस्था अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करते हे निमित्त साधून संस्थेच्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आपल्याला काही करता येईल का?

या सद्भावनेतून संस्थेस आपल्या मातोश्री कै सौ सीताबाई रामकृष्ण देशमुख व आपले वडील कै रामकृष्ण यशवंत देशमुख यांच्या स्मरणार्थ देणगी स्वरुपात रक्कम दिली आहे.

माध्यमिक शिक्षण ल ना होशिंग विद्यालयात घेऊन पदव्युत्तर शिक्षण मराठवाडा विद्यापीठात पूर्ण केले.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या नामांकित शिक्षण संस्थेमधून अध्यापनाचे पवित्र कार्य करून २००१ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.

सेवानिवृत्त नंतर ही पुणे येथील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये इंग्रजी अध्यापनाचे कार्य केले आहे.


विद्यालयाप्रति कृतज्ञता आणि विद्यार्थ्यांसाठीची तळमळ यातून दिसून येते.या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here