मोठ्या प्रमाणावर क्राँस व्होटिंग ची शक्यता, कोणाला फायदा तर काहींना होणार तोटा
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या मतदान वेळ संपली तरी काही ठिकाणी रांगा होत्या. यामुळे अधिकृत आकडेवारी मिळण्यास उशीर लागणार आहे तरी सरासरी 75.67 टक्के मतदान झाले आहे. किरकोळ प्रकार वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एका मतदान केंद्रावर 97 वर्षाच्या आजी लक्ष्मी क्षिरसागर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मशीन मध्ये बिघाड च्या तक्रारी येत होत्या. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान वेळ संपली तरीही काही ठिकाणी रांगा होत्या.
जामखेड नगरपरिषदेच्या बारा प्रभागातील मतदान टक्केवारी
प्रभाग एक 83.78 प्रभाग दोन 76.92 प्रभाग तीन 72.67 प्रभाग चार 76.43 प्रभाग पाच 70.88 प्रभाग सहा 72.80 प्रभाग सात 72.56 प्रभाग आठ 67.44 प्रभाग नऊ 73.92 प्रभाग दहा 78.71 प्रभाग अकरा 81.88 प्रभाग बारा 80.67
असे एकूण 75.63 टक्के मतदान झाले
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत एकुण मतदान 33161 आहे यात पुरुष 16749 तर स्त्री 16413 असे आहे. यापैकी एकुण पुरुष 12859 तर स्त्री मतदान 12222 असे एकूण 25081 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला यामुळे 75.63 टक्के मतदान झाले.
सभापती प्रा राम शिंदे व रोहित पवार तळ ठोकून जामखेड मध्ये होते पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त होता. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत चौरंगी पंचरंगी तर काही ठिकाणी दुरंगी लढत आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पॅनल आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण पॅनल नाही काही ठिकाणी अपक्ष उमेदवार पुरस्कृत केले आहेत.
क्राँस व्होटिंग चा उमेदवारांना धोका? नगरपरिषद निवडणूकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदारांना यावेळी तीन मतदान करायचे होते. नगराध्यक्ष पदासाठी एक व दोन नगरसेवकांसाठी प्रत्येकी एक मत असे तीन मते टाकावी लागणार होती. परंतु सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत क्राँस व्होटिंग सुरू होती याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा हे मतमोजणी दिवशी स्पष्ट होईल.
दोन दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील गल्लोगल्ली रात्री उशिरा पर्यंत लक्ष्मी दर्शन दिसून येत होते. दुचाकी चार चाकी गाड्या रात्रभर इकडून तिकडे फिरत होत्या यामुळे कामाचा विजय होणार कि लक्ष्मी पावणार हिच चर्चा शहरात रंगली आहे.