जामखेडचा प्रथम जनतेतील नगराध्यक्ष कोण? क्राँस व्होटिंगचा धोका कोणाला फायदा कोणाला होणार

0
590

जामखेड न्युज——-

जामखेडचा प्रथम जनतेतील नगराध्यक्ष कोण?

क्राँस व्होटिंगचा धोका कोणाला फायदा कोणाला होणार

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मोठी रस्सीखेच पाहावयास मिळाली कोठे पंचरंगी, कोठे चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी कोठे दुरंगी लढत होत आहे. मात्र प्रथमत जनतेतून होत असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत होत आहे. येत्या २१ तारखेला कोण नगराध्यक्ष हे कळणार आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणूक हाय होल्टेज ठरली संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार तळ ठोकून जामखेड शहरातील गल्लोगल्ली पिंजून काढली होती. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाध्यक्ष शशिकांत शिंदे, महेबुब शेख, सुषमा अंधारे, नितीन बानुगडे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सुनील शेळके यांच्या प्रचार सभा झाल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा झाल्या. यामुळे राज्यातील प्रमुख नेते जामखेड वर लक्ष ठेवून आहेत.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाले होते. नेमके विकास काम कामी येणार की लक्ष्मी दर्शन पावणार हे मतमोजणी दिवशी स्पष्ट होईल. कोण कोणाचे मते खाणार, कोणाला फायदा होणार तसेच प्रत्येक जण विजयाचा दावा प्रत्येक पक्ष करत आहे.

क्राँस व्होटिंग चा उमेदवारांना धोका?
नगरपरिषद निवडणूकीसाठी मतदारांना यावेळी तीन मतदान करायचे होते. नगराध्यक्ष पदासाठी एक व दोन नगरसेवकांसाठी प्रत्येकी एक मत असे तीन मते टाकावी लागणार होती. परंतु सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत क्राँस व्होटिंग सुरू होती याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा हे मतमोजणी दिवशी स्पष्ट होईल.

प्रभाग दोन ब व प्रभाग चार ब या दोन जागेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तो पर्यंत मतमोजणी होणार नाही त्यामुळे २१ डिसेंबर पर्यंत सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. 

नगरपरिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीतून जामखेडचा प्रथमतःच जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची संधी निर्माण झाली होती. २ डिसेंबरला जामखेडच्या मतदारांनी भरभरुन ७५.६३% मतदान केले. याचाच अर्थ जनता गेली ९ वर्षेयाची वाट पाहत होती. मतदान झालं… उमेदवार या प्रचाराच्या रणधुमाळीतून काहीसे मोकळे होत असतानाच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी ही २१ डिसेंबरपर्यंत लांबली. म्हणजेच नगराध्यक्ष पदाच्या निकालाची एक टांगती तलवार डोक्यावर आहेच. शिवाय दोन ठिकाणचे मतदानही होणार आहे. अशा परिस्थितीत चौकाचौकात, वडाखाली,चहाच्या टपरीवर, नाक्या नाक्यावर, गल्लीबोळात नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडी संदर्भात बेरीज-वजाबाकीच्या समिकरणांच्या कढीला ऊत आला आहे. यंदाच्या निवडणुकीत रस्सीखेच खूपच आहे. येणारा उमेदवार अल्पशा फरकानेच निवडून येईल, अशी शक्यता आहे. प्रचार यंत्रणेत सर्वच प्रमुख पक्षांनी कोणतीच कसूर ठेवली नाही. पण जनतेने कुणाला कौल दिलाय हे आता २१ तारखेलाच समजणार आहे. त्यात प्रांजलताई चिंतामणी (भाजपा), संध्याताई राळेभात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), जैनब कुरेशी (काँग्रेस पक्ष), सुवर्णाताई निमोणकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट),पायलताई बाफना (शिवसेना शिंदे गट) यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच असल्याची चर्चा जामखेड करांमध्ये दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत असूननिवडून येणारा नगराध्यक्ष हा केवळ ४०० ते ५०० मतांनी विजयी होईल, अशाही चर्चा सुरु आहेत. सध्या प्रत्येक पक्ष आमचाच नगराध्यक्ष होणार असल्याचा दावा करताना दिसतोय. पण जामखेडमध्ये या वर्षी पंचरंगी लढत झाल्यामुळे धक्कादायक निकाल हाती येण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोणाची लॉटरी लागते अन् कोणाचा राजकीय गेम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जामखेडच्या मतदारांचा शेवटपर्यंत कोणालाही अंदाज आलेला नाही, हेही तेव्हढेच महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here