जामखेड प्रतिनिधी
पिंपखेड हसनाबाद जनसेवा पॅनल हा सर्व सामान्य जनतेला बरोबर घेऊन विकासाचा अजेंडा घेऊन बनविला आहे. आम्ही विकासावर मते मागत आहोत तर विरोधक पैशाच्या जोरावर मते मागत आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व सामान्य लोकांना विश्वासात घेऊन लोकांनी सांगितलेल्या लोकांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत असा विश्वास पॅनल प्रमुख काशिनाथ ओमासे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ओमासे म्हणाले की, विकास कामे मार्गी लावण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा आघाडी बनवली आहे व लोकांमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे त्यामुळे विजय निश्चित आहे.
यावेळी बोलताना बापुसाहेब घाडगे म्हणाले की, ग्रामपंचायत मध्ये दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार नाहिसा करण्यासाठी आम्ही निवडून लढवत आहोत आम्ही आमदार रोहित पवार, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पॅनल लढवत आहोत. आमचा विजय निश्चित आहे.

गावातील प्रमुख विश्वासराव भोसले, व्हाईस चेअरमन भागुजी कदम, मगणभाई शेख, तुळशीराम लबडे, मोहिद्दीन शेख, कुंडलिक कदम, माजी सरपंच मारूती कदम यांना बरोबर घेऊन उमेदवार ठरविले आहेत. प्रभाग एक – गायकवाड पुष्पा, ढोले शकुंतला, प्रभाग दोन – कदम अंगद, ओमासे काशिनाथ, शेख नजमा
प्रभाग तीन – कदम ज्ञानेश्वर, ओमासे संगिता, लबडे गजराबाई असे उमेदवार आहेत. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत.