जामखेड प्रतिनिधी
सरपंच पदाच्या काळात मी केलेल्या विकास कामांमुळे व तसेच शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत नेल्या मुळे जनतेच्या आग्रहाखातर परत पॅनल उभा केलेला आहे व गावचा विकास हाच माझा ध्यास असुन त्यासाठी मी तुमच्या सोबत सदैव झटत राहील असे माजी सरपंच सदाशिव वराट यांनी सांगीतले. साकतचे ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराजाच्या चरणी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ साकेश्वर जनकल्याण पॅनल (तिसरी आघाडी ) करण्यात आली
यावेळी माजी चेअरमन हनुमंत वराट, प्रा.पाडुरंग वराट,
नागनाथ अडसूळ, रमेश अडसुळ, पोपट अडसुळ, शंकर वराट, वशिष्ट वराट, झुंबर वराट, मिलिंद मोरे, छगन वराट,
नेमाने यांच्या सह यांच्या सह सर्वसामान्या जनता
मोठ्या संख्यने उपस्थित होती.
यावेळी बोलताना माजी सरपंच सदाशिव वराट म्हणाले की, सरपंच पदाच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लागली जनतेने माझ्यावर सदैव प्रेम केले असुन असेच असावे अशी माझी अपेक्षा आहे यावेळी सर्वसामान्याचा माणुस म्हणुन नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. यामुळे माझा जनकल्याण पॅनल बहुमताने विजयी होणार आहे असा विश्वास व्यक्त केला.