जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित भव्य अशी जामखेड मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
आज दि. १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असून तो संपूर्ण देशात साजरा विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच आरोग्यचे महत्त्व लक्षात यावे यासाठी “जामखेड मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. राम शिंदे यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचा ध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेकरिता जामखेड व कर्जत तालुक्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकुण २३० स्पर्धक सहभागी झाले होते.
जामखेड येथील नागेश्वर चौक ते सरदवाडी फाटा व पुन्हा परत नागेश्वर चौक असे ८ किलो मीटरची ही स्पर्धा होती यामध्ये विजयी स्पर्धकांना भाजपा जिल्हा सरचिटणीस आजीनाथ हजारे यांच्या वतीने ११ हजार रुपयांचे प्रथम बक्षीस संजय झाकणे यांनी मिळवले
युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कार्ले यांच्या वतीने ७ हजारांचे व्दितीय बक्षीस रामेश्वर मुंजाळ,
माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात तृतीय बक्षीस ६००० रू विक्रम बोरुडे,
माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांचेकडून चौथे बक्षीस ५००० रू महेश वाकुडे
यांना तर युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे (मामा) यांचेकडून ३००० रुपयांचे पाचवे बक्षीस दिपक गाढवे
या सर्व स्पर्धकांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य डाॅ. भगवानराव मुरुमकर, जिल्हा बँकेचे संचालक आमोल राळेभात, माजी नगरसेवक आमितशेठ चिंतामणी, भाजपा कर्जत/जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवी सुरवसे, आजिनाथ हजारे, शरद कार्ले, संजय कार्ले, ॲड. प्रविण सानप, काशिनाथ ओमासे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पै. शरद (दादा) कार्ले,उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे, प्रविण चोरडीया, सोमनाथ राळेभात, राजुशेठ देशपांडे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, मनोज कुलकर्णी, पांडुरंग उबाळे, तात्याराम पोकळे, वराट सर, विक्रांत घायतडक, विनोद बेलेकर, डॉ. अलताब शेख, डॉ. गणेश जगताप, महेश मासाळ, श्रीराम डोके , शहरअध्यक्ष आभिजित राळेभात, गणेश आजबे, ऋषीकेश बांबरसे, विक्रांत घायतडक, सचिन सदाफुले, पिंटू माने, कैलास नेटके, वैभव कार्ले, योगिराज राऊत, प्रविण कार्ले, मोहन देवकाते, चंद्रकांत कार्ले, नितीन धनवटे, आशिष कार्ले, बंडू कार्ले, अंगद कार्ले, राहूल पवार, विनोद गंभीरे, मंगेश कार्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै. शरद कार्ले यांनी मानले