जामखेड पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा, साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत- पंधरा जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

0
221
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड पोलिसांच्या पथकाने भल्या पहाटे जुगार अड्ड्यावर धाड टाकत सुमारे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्याची धडाकेबाज कारवाई केली आहे.या प्रकरणी 15 जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई 17 रोजी पहाटे जामखेड तालुक्यातील वंजारवाडी शिवारात करण्यात आली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील एका ऊसाच्या शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची बातमी जामखेड पोलिसांना मिळाली होती. जामखेड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने 17 रोजी वंजारवाडी शिवारातील एका ऊसाच्या शेतात छापेमारी केली. याठिकाणी ऊसाच्या शेतात झोपडी बांधून जुगार अड्डा चालवला जात होता. या छाप्यात 5 लाख रूपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. येथील जुगार अड्ड्यावर विनापरवाना तिरट नावाचा जुगार खेळला जायचा.
पोलिस काँस्टेबल संदिप आजबे यांच्या फिर्यादीवरून 15 जणांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अ  प्रमाणे 1) दादा लक्ष्मण इपार रा वंजारवाडी 2) बाळासाहेब हरी भाऊ साठे रा जवळके 3) घनश्याम कैलास डोके रा खर्डा 4) हनुमंत उत्तम देवकर रा रत्नापूर तालुका परांडा 5) अजय बबन साठे रा रत्नपुर तालुका परंडा 6) राजेंद्र उद्धव डहाळे रा तरडगाव 7) रामा जानू आव्हाड रा वंजारवाडी  8) महादेव लक्ष्‍मण शेतकर रा वंजारवाडी 9) संभाजी सिताराम कराड रा वंजारवाडी 10) संदीप भीमा भोसले रा वंजारवाडी 11)  हर्षद नजमो शेख रा धनेगाव 12) किरण मुकुंद गोलेकर रा खर्डा 13) महेश शहाजी काळे रा धनेगाव 14) प्रकाश रामकृष्ण गोलेकर रा खर्डा
15) योगेश अण्णा सुरवसे रा खर्डा ता जामखेड यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामखेड पोलिसांनी वंजारवाडीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर केलेल्या छापेमारी एकुण 05 लाख 35 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संभाजी शेंडे हे करत आहेत.
ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक नगर,  सौरभ अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक नगर, अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग,  यांचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात ,पोलीस नाईक अविनाश ढेरे ,पोलीस नाईक संभाजी शेंडे ,पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, विजय कोळी, अरुण पवार, संदीप आजबे ,        बिराजदार धनराज यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here