जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
सुयोग्य पद्धतीने नियोजन करून कृषी विभागाशी संबंधित कामे मार्गी लावली जातील कोणत्याही शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे नवनियुक्त कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले.
नवनियुक्त कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस तथा साकतचे सरपंच हनुमंत पाटील, युवा नेते युवराज उगले, पै सूरज रसाळ, उपसरपंच बळीराम कोल्हे, सोमनाथ कोल्हे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आष्टी जि. बीड येथुन सुपेकर जामखेड येथे बदली होऊन आलेले आहेत. यावेळी जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की, आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी अधिकारी कृषी सेवक, सहकारी व पत्रकार सर्वाच्या सहकार्याने सुयोग्य नियोजन करून चांगली व दर्जेदार शेतकरी हिताचे कामे पूर्ण केली जातील असे सुपेकर यांनी सांगितले.