जामखेड प्रतिनिधी
सव्वा कोटी रुपयांची पेयजल योजना राबवूनही बोगस कामामुळे गाव व वाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. विरोधकांनी शासकीय योजनांची कामे बोगस करून फक्त स्वतःच्या स्वार्थ साधून घेतला हे जनता आता चांगले ओळखून आहे. मतदानातून मतदार दादा काकांची दुकानदारी बंद करतील व 13 / 0 असा धुराळा उडवतील
असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट यांनी व्यक्त केला.
श्री साकेश्वर परिवर्तन पॅनलचा प्रचाराचा नारळ भव्य शक्तीप्रदर्शनात श्री साकेश्वर महाराजांच्या चरणी
वाढवण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, माजी चेअरमन हनुमंत वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, डाॅ. सुनील वराट, प्रभाकर वराट, पोपट वराट, डाॅ. राम वराट, दादासाहेब वराट, कैलास वराट, युवराज मुरुमकर, गणेश वराट, युवराज वराट, भरत लहाने, नानासाहेब लहाने, प्रा. भागवत वराट, शहादेव वराट, भाऊसाहेब वराट, महादेव वराट, राजाभाऊ वराट, वसंत वराट, शिवाजी मुरुमकर, शंकर वराट, विठ्ठल वराट, शिवाजी कोल्हे, पांडुरंग अडसूळ राहुल वराट, सचिन वराट,
विशाल नेमाने, अविन लहाने, कृष्णा पुलवळे, विठ्ठल वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी
बिनविरोध निवडून आलेले राजू वराट, शिवाजी कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संजय वराट म्हणाले की, परिवर्तन निश्चित होणार आहे. हा पॅनल सर्वसामान्य लोकांना घेऊन बनविला यामुळेच दोन जागा बिनविरोध आल्या आहेत. हीच खरी परिवर्तनाची सुरूवात सुरूवात झाली आहे. हा एकजुटीचा विजय आहे. आजपर्यंत व पुढेही तुमच्या सेवेसाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आहोत.
विरोधकांनी शासनाच्या योजना आणल्या पण निकृष्ट दर्जाचे कामे करून मलिदा खाण्याचे काम केले
योजनेचा गावांसाठी काहीही उपयोग झाला नाही.
आतापर्यंत विरोधकांनी लोकांना फक्त भुलभुलैय्या दाखवला. आता मतदार फसणार नाहीत. 13 – 0 करणारच विरोधकांना स्वतः ची पोळी भाजण्यासाठी सत्ता हवी आहे.
आता लबाडी चालणार नाही. चार लाख रुपयांचा आरो प्लॅन्ट बसविला पण चार लीटर पाणीही मिळाले नाही. विरोधक गोडबोले आहेत विकास शुन्य आहे. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांवर विरोधकांनी बोलावे विकासावर बोलावे असे जाहीर आवाहन वराट यांनी केले. दादा काकांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे सांगितले.
यावेळी बोलताना प्रा. युवराज मुरुमकर म्हणाले की,
गावाच्या कल्याणासाठी संजय वराट व प्रा. अरुण वराट झटतात हे दोन्ही आदर्श व्यक्तीमत्व आहेत. परिसरात शैक्षणिक संकुल उभे केल्याने परिसराचा विकास होणार आहे.


कैलास वराट सर म्हणाले की, विकासाचा मुद्दा नसल्याने विरोधक ग्रामपंचायत विकास मुद्दे बाजूला ठेवून ज्यांनी शैक्षणिक संकुल उभे केले त्यांच्या विरोधात प्रचार सभेत बोलले आम्ही आणलेल्या शैक्षणिक संकुलामुळे दरवर्षी दहा ते पंधरा मुले डॉक्टर होतात तेवढेच इंजिनिअर होतात. विरोधकांनी विकासाच्या मुद्यावर बोलावे असे जाहीर आवाहन केले. मागच्या निवडणुकीतील तुमच्या बरोबरचे आता आमच्या बरोबर आहेत. खासदार सुजय विखे-पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणुन विकास करणार आहोत.
यावेळी बिनविरोध निवडून आलेले राजू वराट म्हणाले मी पाच वर्षे प्रामाणिकपणे संजय वराट सरांबरोबरच राहणार आहे. कोणी काहीही म्हणोत. यावेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.