विकास कामांमुळे पुन्हा श्री साकेश्वर जनसेवा पॅनलची बहुमताने सत्ता येणार – डॉ भगवानराव मुरुमकर *विरोधकांना सर्व सत्ता स्वतःच्या घरात लागते ते कार्यकर्त्यांची संधी हिरावतात*.

0
177
जामखेड प्रतिनिधी
 केलेल्या विकास कामांमुळे जनता श्री साकेश्वर जनसेवा पॅनल बरोबर आहे. विरोधकही सत्तेत होते. त्यांनी गावासाठी कोणते भरीव काम केले ते सांगावे एकही काम त्यांच्या कडे सांगण्यासारखे नाही. फक्त निवडणुकीत दिसणारे परत गायब असतात त्यामुळे श्री साकेश्वर जनसेवा संपुर्ण पॅनल बहुमताने निवडून येणार आहे. विरोधकांना सत्ता स्वतःच्या घरात लागते.असे पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवान मुरुमकर यांनी प्रचाराचा नारळ फोडताना सांगितले.
      प्रचंड शक्तीप्रदर्शन करत साकत ग्रामपंचायत निवडणूक 2021 श्री साकेश्वर जनसेवा पॅनेलचा प्रचाराचा नारळ फोडुन शुभारंभ करण्यात आला यावेळी पॅनेल प्रमुख मा. सभापती भगवान मुरुमकर माजी सरपंच हनुमंत पाटील, माजी सरपंच हरीभाऊ मुरुमकर, माजी चेअरमन हनुमंत वराट, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव घोलप, जालिंदर नेमाने, श्रीराम घोडेस्वार, रामहारी नेमाने दिलीप घोलप ,प्रकाश वराट ,भास्कर वराट,राजेंद्र मुरूमकर, ज्ञानेश्वर लहाने,संजय बापु मुरूमकर, साहेबराव कडभने (चेअरमन),बाळासाहेब वराट,गहिनाथ पुलवळे, सुनिल पुलवळे व पॅनेलचे उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे आणली व गावासाठी रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या
     सत्तेत असताना आम्ही गावातील विठ्ठल मंदिराचा क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करून भक्तांच्या भव्य निवासस्थानाची सोय केली. गाव व वाडीवस्तीवरील रस्ते क्राॅक्रिटीकरण पेव्हिंग ब्लाॅक बसवून रस्त्यावर पथदिवे बसवलेले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत नदी व ओढे खोलीकरण केल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली यामुळे गावाच्या उत्पन्नात वाढ झाली. रस्ते, वीज व पाणी याबाबत गाव व वाड्यांना स्वयंपूर्ण केले आहे.
 मी तालुक्याचे राजकारण करीत असल्याने गावात ग्रामपंचायत व साकत सेवा संस्थेत घरातील उमेदवार कधी देत नाही कार्यकर्ते यांना संधी देतो मात्र विरोधक स्वतः हा उमेदवारी करतात घरचेही उभे करून कार्यकर्त्यांची संधी हिरावून घेत असल्याचा आरोप डॉ. भगवान मुरूमकर यांनी केला व केलेल्या विकास कामांमुळे संपुर्ण पॅनल प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे असे मुरूमकर म्हणाले.
    आमचा पॅनल बहुमताने सत्तेत येणार आहे. पुढील पाच वर्षांत गाव व वाड्यासाठी शुद्ध आरोचे पाणी देणार, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे संपुर्ण गावात बसवून चोरांपासून गावाचे संरक्षण करणार आहोत. तसेच गाव कचरा मुक्त करण्यासाठी घंटागाडी सुरू करणार गावातील तरूणांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार आहोत. रस्ते, वीज व पाणी याबाबत गाव वाडी वस्ती स्वयंपूर्ण करणार बचत गटा मार्फत महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार तसेच महिलांसाठी स्वतंत्र शौचालये उभारूण मुबलक पाण्याची सोय करण्यात येणार आहे. अशा प्रकारे जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
    गावात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी जोरदारपणे शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here