Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या शहरातील जनतेला दोन वर्षे पाण्यापासून वंचित ठेवणार्‍या आमदार रोहित पवारांना जनता नगरपरिषद...

शहरातील जनतेला दोन वर्षे पाण्यापासून वंचित ठेवणार्‍या आमदार रोहित पवारांना जनता नगरपरिषद निवडणूकीत जागा दाखवेल – माजी मंत्री प्रा. राम शिंदे

0
263
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट ) 
जामखेड शहरासाठी उजनी धरणातून मी मंजूर केलेली पाणी पुरवठा योजना केवळ श्रेय घेण्यासाठी दोन वर्षे प्रलंबित ठेवून जामखेड शहरवासीयांना दोन वर्षे स्वच्छ पाण्यापासून वंचित ठेवले. तसेच आम्ही मंजूर केल्याल्या कामांचे भूमिपूजन करून आमदार रोहित पवार ही योजना व कामे मीच मंजूर केली असा धिंडोरा पिटवून व ठिकठिकाणी फलक लावून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी टीका करतानाच ही कामे कोणी केली हे जनता ओळखून आहे. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा विश्वासही माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
    जामखेड शहरासाठी मंजूर दहिगाव पाणी पुरवठा योजना व अनेक विविध कामांच्या मंजुरीवरून आ. रोहित पवार व माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यात चांगलाच कलगीतुरा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजीमंत्री व भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी जामखेडमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत
पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, तालुकाध्यक्ष अजय काशिद, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, पंचायत समितीचे उपसभापती रवी सुरवसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, उपाध्यक्ष मोहन गडदे (मामा), शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, पांडुरंग उबाळे प्रविण सानप, केशव वनवे, अभिजित राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, गणेश आजबे, अर्जुन म्हेत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
       यावेळी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून उजनी धरणातून जामखेडची पाणीपुरवठा योजना आपण जून २०१८ ला प्रस्तावित केली होती. त्यातून  योजनेच्या मंजूरीच्या अनुसंधाने जवळपास एक टक्का निधी भरला होता. एकुणच १ आॅगस्ट  २०१९ ला त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेडच्या सभेत तत्वत: मान्यता दिली होती. आज या गोष्टीला दोन वर्षे झालेले आहेत. आता नव्याने आ. रोहित पवार सांगत आहेत की ही योजना मी मंजूर केली पण माझा त्यांच्यावर आरोप आहे की ही योजना जाणीवपूर्वक दोन वर्षे प्रलंबित ठेवली कारण याचे श्रेय आम्हाला मिळू नये. मात्र आमच्याच कालखंडात परवानग्या, पाणी आरक्षण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला १ % रक्कम भरणे अशा सर्व गोष्टी व परवानग्या घेण्यात आल्या होत्या.
        जलयुक्त शिवार च्या माध्यमातून मतदारसंघात सिमेंट बंधारे बांधण्यात आली त्यामुळे तालुका टँकर मुक्त झाला. तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे याकडे आमदार लक्ष देत नाहीत. फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी  सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार करत आहेत खर्डा किल्ल्या साठी आम्ही चार कोटी निधी मंजूर करून किल्लाचे काम केले पंरतु जी अर्धवट कामासाठी त्यांनी निधी आणावा. भगवा झेंडा हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे आम्ही कधीच झेंडा मिरवत फिरलो नाही. कर्जत येथील गोदड महारांच्या पालखी समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पायदळी तुडवत आ. रोहित पवार यांनी मोठी गर्दी केली. यावर पोलीस काय कारवाई करणार असा प्रश्न पडतो तसेच आजोबा शरद पवार यांचे सुचना धुळीस मिळवून हे महाशय गर्दी करत. व कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेले नियम मोडत आहेत.  या शिवाय अनेक विषयांवर त्यांनी आ. रोहित पवार यांचेवर टिका केली.
एकंदरच ही पत्रकार परिषद जरी आ. रोहित पवार यांचे कारभार टीका करण्यासाठी असली तरी माजीमंत्री हे मतदार संघातील पुन्हा एकदा कृतीशिल झाल्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल अशी अपेक्षा ठेवण्यात हरकत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!