जलसंधारणाची दर्जेदार कामे करून गावातील पाणी टंचाई दुर करणार – नामदार शंकरराव गडाख

0
395
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
      गावातील पाण्याची टंचाई लक्षात घेता गावातच जलसंधारणची दर्जेदार कामे करून पाण्याची टंचाई दुर करू पाणी अडवा पाणी जिरवा तसेच तलाव खोलीकरण व सिमेंट बंधारे अशी जलसंधारणाची दर्जेदार कामे करून पाणी टंचाई दुर करू असे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी सांगितले
  जामखेड तालुक्यातील बावी गावात कवादे वस्ती येथे शिवसंवाद बैठक पार पडली यावेळी नामदार शंकरराव गडाख बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख संजय काशिद, सरपंच निलेश पवार, फक्राबादचे सरपंच विश्वनाथ राऊत, बाळासाहेब पवार, उपसरपंच दादा मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य राहुल कवादे, राम पवार, महादेव कारंडे, माजी सरपंच शहाजी कवादे, सोसायटी चेअरमन दादासाहेब पवार, ग्रामसेवक फरताडे भाऊसाहेब माजी सरपंच सुनील चिकने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
    यावेळी सरपंच निलेश पवार यांनी नामदार शंकरराव गडाख यांचा सत्कार केला.
    बावी गावच्या पाण्याची टंचाई पाहता गावातील दोन्ही तलावाचे खोलीकरण रुंदीकरण करून दुरूस्ती करावी तसेच काही सिमेंट बंधारे बांधले जावेत अशा प्रकारे मागणीचे निवेदन सरपंच निलेश पवार यांनी नामदार गडाख यांना दिले याविषयी बोलताना गडाख यांनी सांगितले की, गावातील पाण्याची गरज गावातच जलसंधारण कामे दर्जेदारपणे करून सोडवणे आवश्यक आहे त्यामुळे गावात पाणी अडवा पाणी जिरवा तलाव खोलीकरण व सिमेंट बंधारे तसेच समतल चर याद्वारे गावातच भुगर्भातील पाणी साठा वाढवला जाईल व गावाची पाण्याची गरज गावातच पुर्ण होईल असेही गडाख यांनी सांगितले
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. बाळासाहेब पवार यांनी केले तर आभार सरपंच निलेश पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here