Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड शहराची १३९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आमदार रोहित पवारांमुळे मंजूर –...

जामखेड शहराची १३९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आमदार रोहित पवारांमुळे मंजूर – प्रा. मधुकर राळेभात

0
319
जामखेड प्रतिनिधी
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १३९ कोटी रूपयांच्या दहिगाव पाणी पुरवठा योजनेचे सर्व श्रेय आ. रोहित पवार यांचेच आहे. मात्र जामखेड शहरासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना ही माझ्याच काळात झाली आहे. मात्र विद्यमान आमदार हे आपणच ही योजना मंजूर केली असे म्हणत श्रेय घेत आहेत असे माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आ. रोहित पवार यांचेवर टीका केली होती त्यास प्रति उत्तर देण्यासाठी तसेच कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांनी मतदारसंघातील दोन वर्षांत केलेल्या कामासंदर्भात ही पत्रकार परिषद आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात व तालुकाध्याक्ष दत्तात्रय वारे यांनी येथील विश्रामगृहत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांचे समावेत तालुकाध्यक्ष
दत्तात्रय वारे, पंचायत समिती सभापती सौ राजश्रीताई मोरे,
साकतचे सरपंच हनुमंत पाटील,  राजेंद्र पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, वैजीनाथ पोले, राहुल अहिरे, प्रकाश काळे, समीर चंदन, दादा महाडिक, ॲड. हर्षल डोके,  पवन राळेभात, प्रशांत शिंदे, महेंद्र राळेभात, महेश राळेभात, अमित जाधव, उमर कुरेशी, सचिन शिंदे, दिगांबर चव्हाण, अमित जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
    यावेळी पुढे बोलताना त्यांनी  सांगितले की, ही सर्व कामे मी केली. मात्र जामखेड नगरपरिषदेचा चार वर्षांच्या कालावधीत नगरपरिषद त्यांच्या ताब्यात होती. जामखेडला उजनीही पाणी पुरवठा व्हावा हा विषय सर्वात प्रथम मी मांडला. नगर परिषद ताब्यात असल्याने माजीमंत्री यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना ही योजना मंजूर करण्यात यश आले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांच्या जाहीर सभेत सांगितले की या योजनेला मंजुरी दिली. परंतु हा राजकीय जुमला होता असे माझे मत आहे.
  योजनेचे काम सुरू झाल्यानंतर अंतर्गत पाईपलाईनचा करताना जे खोदकाम करावे लागणार आहे. त्यात नव्याने केलेले रस्ते उखडावे लागतील व त्यासाठी झालेला शासनाचे दिड कोटींचा खर्च पाण्यात जाणार आहे. जर राम शिंदे यांनी ही योजना मंजूर केली असती तर शहरात ही कामे रस्ते केल्यानंतर झाली असती. तो रस्त्यावर खर्च झालेला निधी इतर कामांवर खर्च करता आला असता. अजूनही शहरासाठी स्मशानभूमी नाही. बगीचा नाही. वयोवृद्ध मानसांना फिरायला जागा नाही. अजूनही शहराभोवती  हागणदारी आहे. याशिवाय अनेक कामे होणे गरजेचे आहे. ही सर्व कामे कामे करता आली असती. माजीमंत्री राम शिंदे यांनी नगरपरिषदत ताब्यात असताना कार्यकर्ते व नगरसेवक पोसण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आपले कार्यकुशल आ. रोहित पवार यांनी तुमचा आमचा विकास करताना जामखेड शहराचा विकास करत असताना जामखेड व सलग्न खेडी हा केंद्रबिंदू ठेवून सर्वांना कसे पाणी मिळेल असा प्रयत्न जामखेड शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १३९ कोटी रूपयांच्या दहिगाव पाणी पुरवठा योजनेचे सर्व श्रेय आ. रोहित पवार यांचेच आहे.
आ. रोहित दादांच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे व शहराचे योग्य नियोजन यामुळे जामखेड नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच ताब्यात येणार असून ही पाणी पुरवठा योजना चांगल्याप्रकारे राबवण्याचे काम आम्ही करणार आहोत. तसेच शहराच्या विकासासाठी इतरही अनेक कामे केली आहेत आहेत. यामुळे विरोधकांनी जनतेची दिशाभूल करू नये. कारण जामखेडची जनता सुज्ञ असून त्यांच्या भुलथापांना ती बळी पडणार नाही असा विश्वासही यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला.
या बरोबरच शहर व तालुक्याच्या विकासासाठी आ. रोहित पवार पवार यांच्या माध्यमातून अनेक मोठी कामे केली जात आहेत की ज्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल. यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार अमित जाधव यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!