जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायतच्या सात पैकी पाच सदस्य माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे बिनविरोध आल्याबद्दल आज प्रा. राम शिंदे यांनी आनंदवाडी येथे येऊन पाचही सदस्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, आनंदवाडी ग्रामपंचायत मधील सात पैकी पाच सदस्य भाजपाचे ग्रामस्थांनी बिनविरोध निवडले आहेत. दोन जागेवर समजोता झाला नाही. पण तेही आमच्या विचाराचे निवडणूक येणार आहेत. पाच वर्षांत केलेल्या विकास कामांमुळे जनता आजही विश्वास ठेवून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपच्या बिनविरोध झाल्या आहेत. तर निवडणूक होणार्यांही जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात येणार आहेत.
यावेळी बिनविरोध निवडून आलेले पाच सदस्य भारत महादेव होडशिळ, बबन धोंडिबा जायभाय, निलावती परमेश्वर गीते, सोजरबाई लक्ष्मण राख, प्रकाश दगडू गीते हे पाच सदस्य निवडून आले आहेत. या पाचही सदस्यांचा सत्कार माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.
यावेळी चेअरमन संजय कार्ले जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,
वैजीनाथ सांगळे, भीवा खाडे, सुजित खाडे, रावसाहेब सांगळे, हनुमान सांगळे माजी सरपंच, गणेश खाडे, विक्रम सानप, गणेश सांगळे, भारत जायभाय यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चौकट
नगरपरिषद निवडणुकीत जनतेच्या मनातील उमेदवार देणार मागील नगरपरिषद निवडणूकीत उमेदवारी देताना काही चुका झाल्या होत्या यावेळी त्या होणार नाहीत उमेदवारी देताना जनतेच्या मनातील उमेदवार देणार आहोत. मंत्रीपदाच्या काळात केलेल्या विकास कामाची पावती म्हणून तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात येतील तसेच नगरपरिषद ही भाजपच्या ताब्यात येईल.