जामखेड प्रतिनिधी
रखडलेल्या विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी अपक्ष निवडणूक लढवत असून माळेवाडी गावाचा विकास करायचा आहे असे अपक्ष उमेदवार शिवाजी नारायण विधाते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना विधाते म्हणाले की, माळेवाडी ते रंधवे वस्ती डांबरीकरण करणे, निर्मळवस्ती ते विधातेवस्ती डांबरीकरण, माळेवाडी ते दिघोळ डांबरीकरण रस्ता, माळेवाडी ते राऊत वस्ती सिमेंट काँक्रिटीकरण, माळेवाडी गावातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभीकरण, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना राबविणे, परिसरात सिंगल फेज लाईटची व्यवस्था करणे, माळेवाडी ते विधातेवस्ती डांबरीकरण रस्ता करणे या विकास कामासाठी मी अपक्ष उमेदवारी करत आहे. जनतेचा आशिर्वाद पाहता मोठ्या मताधिक्याने विजयी विजय होणार आहे असा विश्वास शिवाजी नारायण विधाते यांनी सांगितले.