जामखेड न्युज – – – – –
नागेश विद्यालयाच्या विकासाला मिळणार नवी दिशा! स्थानिक सल्लागार-समन्वय समितीवर प्रकाश काळे यांची निवड

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार / समन्वय समितीवर प्रकाश काळे यांची सन २०२६-२७ ते सन २०२८-२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.

विद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच सर्वांगीण विकासासाठी स्थानिक सल्लागार-समन्वय समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. या समितीवर प्रकाश काळे यांची निवड झाल्याने विद्यालयाच्या विविध उपक्रमांना तसेच विकासकामांना त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक उपक्रम, शैक्षणिक वातावरण आणि विविध सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
विद्यालयाच्या प्रगतीला नवी दिशा मिळावी तसेच शाळेची यशस्वी वाटचाल अधिक बळकट व्हावी, यासाठी प्रकाश काळे यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





