जामखेड न्युज – – –
आपल्या आक्रमक आणि जलद खेळी प्रमाणे क्रिकेटची कारकिर्दही ‘फास्ट’ पुढे नेणारा भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा त्याच्या हटके लाईफस्टाईलसाठी चर्चेत आला आहे. हार्दिक यावेळी त्याच्या घड्याळामुळे चर्चेत आला असून नुकतेच त्याने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. ज्यात त्याने त्याच्या घड्याळाचा एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोतील घड्याळाची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच फिरतील.
हार्दिक पंड्याने घातलेले घड्याळ हे 5711 या ब्रँडचे असून याची किंमत ही 5 कोटींपेक्षाही अधिक आहे. पंड्याने घातलेले हे घड्याळ नेटकऱ्यांनी पाहताच त्याची किंमत सर्च केली ज्यानंतर भल्यभल्यांचे डोळे फिरले आहेत. तर पंड्याच हे घड्याळ नेमकं आहे तरी कसं पाहा त्यानेच पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये…
काही दिवसांपूर्वीच मुंबईत घेतलं घर
एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढलेल्या पंड्या बंधूनी स्वत:च्या मेहनतीच्या आणि खेळाच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे. त्यांच्याकडच्या आलिशान गाड्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेकदा दिसत असतात. त्यांनी आताच मुंबईत 30 कोटीचं घर विकत घेतलं. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पंड्या बंधूनी हे घर विकत घेतल्याने सध्या गुजरातमध्ये राहत असलेले पंड्या बंधू मुंबईत स्थायिक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंड्या बंधूनी विकत घेतलेला हा फ्लॅट 3 हजार 838 स्केयर फीटचा आहे. या फ्लॅटमध्ये तब्बल 8 बेडरूम्स आहेत.पंड्या बंधूचा हा फ्लॅट अत्यंत आलिशान असून डीएनएच्या वृत्तानुसार हार्दिक आणि कृणालच्या या घरात सर्व सोयींयुक्त व्यायम शाळा, जिम्नॅशियम आहे. क्रिकेटपटू असल्याने सराव आणि आरोग्य तंदरुस्त ठेवण्यासाठी पंड्या बंधूनी जिमवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. याशिवाय एक स्वतंत्र गेमिंग झोन देखील या फ्लॅटमध्ये आहे. या सर्वासह रिलॅक्स होण्याकरता एक प्रायवेट स्विमिंग पूल आणि प्रायवेट थिएटर देखील या फ्लॅटमध्ये आहे.