जामखेड न्युज – – –
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्या नंतर राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे शिवसैनिक राज्यभर राणेंच्या विरोधात आक्रमक आंदोलन करत असताना दुसरी कडे नाशिक पोलीस त्यांच्या अटकेसाठी रत्नागिरी कडे रवाना झाले आहेत.
दरम्यान राणें यांच्यावतीने रत्नागिरी सत्र न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोठ्या फौजफाट्यासह सध्या राणे थांबलेल्या असलेल्या संगमेश्वर इथे पोहचले आहेत. याच ठिकाणी रत्नागिरी पोलीस त्यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांच्या ताब्यात देतील अशी शक्यता आहे. नाशिक पोलीस पुढील अटकेची कारवाई करतील असे सांगितले जात आहे. रत्नागिरी सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता पण हायकोर्टानेही तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
सध्या नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश, नितेश राणे, आ.प्रसाद लाड हे संगमेश्वर इथे पोलिसांशी चर्चा करत आहेत.