जामखेड न्युज – – – – – –
संजय कोठारी सामाजिक कार्यासोबतच व्यवसायातही अग्रेसर – सभापती राम शिंदे
जामखेडमध्ये ‘पारस ऑटोमोबाईल्स’ महिंद्रा ओरिजनल स्पेअर पार्ट्सचे उत्साहात उद्घाटन.
जामखेड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे सामाजिक कार्याबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही नेहमी अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या पुढाकारातून जामखेड येथे सुरू करण्यात आलेल्या ‘पारस ऑटोमोबाईल्स’ या महिंद्रा ओरिजनल स्पेअर पार्ट्सच्या अधिकृत विक्री केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते झाला.

यावेळी उद्योजक सुमतीलाल कोठारी, नगराध्यक्ष अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, गटनेते तात्याराम पोफळे, नगरसेवक प्रवीण चोरडिया, संजय काशीद, पवन राळेभात, सागर टकले, विकी घायतडक, अर्जुन म्हेत्रे, प्रवीण सानप, आश्रुबा शेळके, ऋषिकेश मोरे, प्रवीण होळकर, सुनील कोठारी, कांतीलाल कोठारी, हर्ष आनंद कोठारी, पारस कोठारी, अशोक चोरडिया, संतोष फिरोदिया, संतोष भनगडे, अशोक शेळके, बाबासाहेब शेकडे तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे राजू जमदाडे व गोविंद सर , रोहिदास केकान, सुमित चाणोदीया, संजय बोरा यांच्यासह जामखेड मधील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास परिसरातील व्यापारी, उद्योजक, वाहनधारक, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

आपल्या भाषणात सभापती प्रा राम शिंदे म्हणाले, जामखेड शहर किंवा तालुक्यात कुठेही अपघात झाला की सर्वप्रथम ज्यांची आठवण येते, ते म्हणजे संजय कोठारी. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ते अहोरात्र धावून जातात. त्यांची ही समाजसेवेची तळमळ खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी, वाहनधारक आणि ग्राहकांना महिंद्रा कंपनीचे दर्जेदार व विश्वासार्ह ओरिजनल सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पारस ऑटोमोबाईल्सची स्थापना करण्यात आली आहे. सेवा, गुणवत्ता आणि विश्वास यांचा संगम असलेला हा उपक्रम जामखेड आणि परिसरातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे सभापती शिंदे यांनी नमूद केले.





