जामखेड न्युज – – – – – –
स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत चे डि फार्मसी परीक्षेत घवघवीत यश
प्रथम वर्षाचा 100 टक्के तर द्वितीय वर्षाचा 98 टक्के निकाल
जामखेड तालुक्यातील साकत येथील स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसीचे साकतने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाने प्रथम वर्षात शंभर टक्के, तर द्वितीय वर्षात ९८ टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे.

महाविद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयात डी.फार्मसी व बी. फार्मसी अभ्यासक्रमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.
प्रथम वर्षात भोसले शुभांगी हिने ७३.९० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. आगे मिताली (७३.६० टक्के) द्वितीय, बोडखे अनुष्का (७१.९० टक्के) तृतीय, शेख सिमरन (७१.३० टक्के) चतुर्थ, तर चव्हाण सतीश (७१.१० टक्के) यांनी पाचवा क्रमांक मिळवला.

द्वितीय वर्षात कोठुळे सुशेन यांनी ७८.३६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. निकम सोनाली (७४.७३ टक्के) द्वितीय, सपकाळ सुषमा (७३.०० टक्के) तृतीय, पठाण सलमान (७२.९१ टक्के) चतुर्थ, तर टेकाळे उज्ज्वला (७२.०९ टक्के) यांनी पाचवा क्रमांक पटकावला.







