Tuesday, June 9, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवार यांचे राजुरीत जंगी स्वागत रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर...

आमदार रोहित पवार यांचे राजुरीत जंगी स्वागत रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

0
23

जामखेड न्युज – – – – – – – 

आमदार रोहित पवार यांचे राजुरीत जंगी स्वागत

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

आमदार रोहित पवार यांचे राजुरी येथे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले तसेच रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरपंच व ग्रामस्थांकडून सत्कार भव्य सत्कार करण्यात आला.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार यांनी नुकतीच तालुक्यातील राजुरी येथील प्रसिद्ध रेणुका माता मंदिर परिसराला भेट दिली.

त्यांच्या विशेष निधीतून मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाची त्यांनी पाहणी केली. या कामाच्या दर्जेदारपणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार रोहित पवार यांची नुकतीच शिक्षण क्षेत्रातील नामांकित ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ उत्तर विभाग अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल राजुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कर्मवीर भाऊराव पाटलांची प्रतिमा देऊन गौरव रोहित दादांच्या या महत्त्वपूर्ण निवडीचे राजुरीकरांनी उत्साहात स्वागत केले.

गावचे सरपंच सागर कोल्हे, पोलीस पाटील आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमदार रोहित पवार यांना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ यांची प्रतिमा (स्मृतीचिन्ह) भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!