जामखेड न्युज – – – – – – –
चौंडीत रोहित पवार गोपीचंद पडळकर आमनेसामने
अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशब्दी जयंती असल्याने राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यादेवी यांचे मूळ गाव जामखेड तालुक्यातील चौैंडी हे असून त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
मात्र, मध्यरात्री कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर हे येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी आमने सामने आले होते. यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काल मध्यरात्री पवार पडळकर आमने सामने आल्यानंतर त्याचीच चर्चा होत आहे.

दोन्ही नेत्यांकडून चौंडी येथील मंदिरात महापूजा करण्यात आली. पडळकर यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. रोहित पवार यांनी पडळकरांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही.

आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री १२ वाजता चौंडी महादेवाच्या मंदिरात पूजा व महाआरती केली. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी खासदार नीलेश लंके हे देखील उपस्थित होते.

परंपरा जपणे आपली संस्कृती – रोहित पवार
आपली संस्कृती आणि परंपरा आहे की आपल्या भूमीमध्ये जे कोणी पाहुणे असतील त्यांचा पाहुणचार करण्याची जबाबदारी असते. खासदार आणि आम्ही सत्कार करण्यासाठी गेले होतो. पण ते कार्यकर्त्यांमध्ये व्यस्त असल्याने सत्कार घेऊ शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. पुढे ते म्हणाले परंपरा जपणे, वाद न घातला एकोप्याचा, बंधुभावाचा संदेश देणे हे महत्त्वाचे असते.
पडळकर म्हणाले…
अहिल्यादेवींचा विचारच भारताला, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो. त्या विचारामध्ये तेवढी ताकद आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार अहिल्यादेवींच्या विचाराने कृतीतून काम करत आहे.













