जामखेड न्युज – – – – –
जामखेड मध्ये गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक; जातेगाव-महारुळीत शिवसेनेच्या नव्या शाखांचे उद्घाटन
संघटना बळकट करण्यासाठी लवकरच शिवसैनिकांचा मेळावा – खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने तसेच पक्ष सचिव रामजी रेपाळे व पक्ष सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील जातेगाव व महारुळी येथे शिवसेनेच्या नव्या शाखांचे उद्घाटन उत्साहात झाले. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले व युवा नेते आकाश बाफना प्रमुख उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील युवकांचा वाढता कल शिवसेनेकडे पाहून जामखेड तालुका शिवसेना पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.याउद्घाटन सोहळ्यास ज्येष्ठ नेते कैलास जाधव, तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, शहरप्रमुख मोहन देवकाते, शहर उपप्रमुख किरण मराळ, खर्डा गटाचे नेते श्याम गोलेकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, जवळा कक्ष प्रमुख कुलदीप पवार, विकी पिंपळे यांच्यासह शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी शिवसेनेची विचारधारा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांची माहिती दिली.शिवसेना ही सर्वसामान्य जनतेची पक्षसंघटना असून पक्षाची विचारधारा व विकासकामे घराघरात पोहोचविण्यासाठी गावागावांत शाखा विस्तार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. जवळा गटातून अल्पवधीतच नितीनजी कोल्हे यांच्या अहोरात्र समाजकार्यातून एक मोठी ताकद शिवसेनेचे निर्माण झालेली आहे तसेच खर्डा गटातून जुने जाणकार शिवसैनिक माजी पंचायत समिती सदस्य कैलास अण्णा जाधव यांच्यामार्फत ही शिवसेना संघटन मजबुतीवर विशेष भर देण्यात आलेला आहे तसेच इतरही सर्व पदाधिकारी यांचे बहुमोल असे कार्य पाहून लवकरच शिवसेनेचा विस्तार जामखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात होईल असा विश्वास सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये रुढ झाला आहे. शाखा उद्घाटन नंतर संपूर्ण ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता.

यावेळी बोलताना आकाश बाफना म्हणाले,जामखेड तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. लवकरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करून संघटना अधिक मजबूत करण्यात येईल. सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे काम करत पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करु.

जातेगाव शाखेची पदाधिकारी निवड : शिवसेना शाखाप्रमुखपदी किरण गायकवाड, युवासेना शाखाप्रमुखपदी महादेव गायकवाड, शिवसेना उपशाखाप्रमुखपदी नंदकुमार गायकवाड तर युवासेना उपशाखाप्रमुखपदी अजय गायकवाड यांची निवड करण्यात आली.

शाखेच्या सदस्यांमध्ये किरण गायकवाड, अजय गायकवाड, शंकर गायकवाड, बालाजी गायकवाड, नितीन गायकवाड, अशोक गायकवाड, कृष्णा गायकवाड, शहाजी गायकवाड, काका गायकवाड, राजेश गायकवाड, नंदकुमार गायकवाड, महादेव गायकवाड, नवनाथ गायकवाड, अक्षय गायकवाड, गोरख गायकवाड, हरिदास गायकवाड, बाळू गर्जे, रवी गायकवाड, विष्णू गायकवाड, संतोष गायकवाड आणि शेषेराव गायकवाड यांचा समावेश आहे.
महारुळी शाखा : शिवसेना शाखाप्रमुखपदी सुनील ढेपे तर युवासेना प्रमुखपदी उत्तमराव ढेपे यांची निवड करण्यात आली.



