Home ताज्या बातम्या जामखेड नगररोडवर अग्नितांडव! आनंद कुशन दुकान पुर्णपणे जळाले, शेजारील दुकानांनाही आगीचा विळखा!

जामखेड नगररोडवर अग्नितांडव! आनंद कुशन दुकान पुर्णपणे जळाले, शेजारील दुकानांनाही आगीचा विळखा!

0
10
जामखेड नगररोडवर अग्नितांडव! आनंद कुशन दुकान पुर्णपणे जळाले, शेजारील दुकानांनाही आगीचा विळखा!

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड नगररोडवर अग्नितांडव! आनंद कुशन दुकान पुर्णपणे जळाले, शेजारील दुकानांनाही आगीचा विळखा!


जामखेड शहरातील नगररोडवरील अद्यावत असणाऱ्या आनंद कुशन या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील दुकानांनाही आगीची झळ पोहोचली आहे. आग विझवण्यासाठी जामखेड नगरपरिषदेची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली; मात्र आगीची तीव्रता पाहता एकाच गाडीच्या आवाक्याबाहेर परिस्थिती असल्याने आष्टी येथूनही अग्निशमन गाडी बोलावण्यात आली आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट!
नगररोडवरील आनंद कुशन दुकानाला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीने दुकानाला वेढा दिल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील दुकानांपर्यंत आग पसरल्याने व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.परिसरातील नागरिकांनी टॅकर बोलावून टॅकर च्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व जण प्रयत्नशील आहेत.

अग्निशमन दलाची धावपळ; आष्टीहूनही मदत
घटनेची माहिती मिळताच जामखेड नगरपरिषदेची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने अतिरिक्त अग्निशमन मदतीची आवश्यकता भासली. त्यामुळे आष्टी येथूनही अग्निशमन गाडी बोलावण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद
आगीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली असून, आगीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे आणि अग्निशमन दलाला काम करण्यासाठी मोकळी जागा मिळणे महत्त्वाचे ठरत आहे.

व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण
शहरातील गजबजलेल्या नगररोडवर ही घटना घडल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, किती नुकसान झाले आणि अन्य दुकानांचे किती नुकसान झाले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा आणि आगीचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे जामखेड शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!