Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये भरदिवसा तरूणावर जीवघेणा हल्ला आठ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा...

जामखेडमध्ये भरदिवसा तरूणावर जीवघेणा हल्ला आठ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

0
8

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये भरदिवसा तरूणावर जीवघेणा हल्ला

आठ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

भाच्याचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकावर लोखंडी टामी व दगडाने डोक्यात मारहाण करून भरदिवसा शहरातील गर्दीच्या ठिकाणी गंभीर जखमी केले. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात चार व इतर चार अशा एकुण आठ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दादासाहेब भगवंत राळेभात (वय ४१, रा. राळेभात वस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाथा शिरशिरे (पूर्ण नाव माहिती नाही), सोमनाथ हनुमंत पवार, दोघे (रा. जामवाडी, ता. जामखेड), किशोर राजू बेद्रे (रा. कोटेवडी, ता. जामखेड) आणि आदित्य दीपक चव्हाण (रा. जामखेड) यांच्यासह इतर चार अनोळखी अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की १४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास बाजारतळ भागातील एका कीराणा दुकानाजवळ फिर्यादी हे त्याठिकाणी भाच्याचे भांडण सोडवण्यासाठी गेले होते. यावेळी वरील आरोपींनी फीर्यादीस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपी सोमनाथ पवार याने “याचा मुडदा पाडला पाहिजे” असे म्हणुन शिवीगाळ केली व फिर्यादीस उचलून जमिनीवर आपटले. तसेच लोखंडी टामीने व दगडाने डोक्यात मारहाण केली. त्यानंतर इतर आरोपींनीही फिर्यादीच्या डोक्यावर, पाठीवर, कंबरेवर व पोटावर मारहाण केली. यानंतर आरोपी सोमनाथ पवार याने फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून घेतल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादी दादासाहेब भगवंत राळेभात यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन वरील चार व इतर चार अशा एकुण आठ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!