जामखेड न्युज – – – – –
उष्णतेचा कहर या तारखे दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकणार असून, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे.

तसेच अंदमान बेटांचा उर्वरित भाग आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून २६ ते ३१ मे दरम्यान केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यात तो महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करतो.

त्यामुळे ६ जूनच्या आसपास कोकण किनारपट्टीवर मान्सूनची पहिली हजेरी लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर काही दिवसांत उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे आगमन होऊ शकते.

सध्या राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असली, तरी वातावरणातील बदल आणि समुद्रातील अनुकूल स्थितीमुळे यंदा मान्सून वेळेआधी किंवा वेळेवर दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विदर्भात उष्णतेचा कहर; अमरावती-वर्ध्यात पारा ४६ अंशांवर
विदर्भात उष्णतेने अक्षरशः कहर माजवला आहे. शनिवारी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान तब्बल ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.




