दहा बारा वर्षापासून राहत असलेल्या न्यायप्रविष्ट जागेतील पत्र्याच्या शेडची मोडतोड करत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण अकरा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
दहा बारा वर्षापासून राहत असलेल्या न्यायप्रविष्ट जागेतील पत्र्याच्या शेडची मोडतोड करत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण
अकरा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
दहा बारा वर्षापासून राहत असलेल्या न्यायप्रविष्ट असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अकरा आरोपींनी घुसून घराची मोडतोड करत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करत मारहाण करून जखमी केले व पाहून घेतो म्हणून धमकी दिली याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकरा जणांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी लता रामदास शिंदे वय-50 वर्षे धंदा- मजुरी रा.बस स्टॅण्डचे समोर जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी फिर्यादीत म्हटले आहे कि,दिनाक 02/05/2026 रोजी दुपारी 02/00 वा. चे सुमारास घरा समोर नगरपरीषदचे पिण्याचे पाणी भरत असताना 1 ) वशीम महेबुब शेक 2) साद शहादुल शेख दोन्ही रा. कोंढवा पुणे ता.जि.पुणे 3) आयमा अब्बदुल शेख रा.• मार्केट यार्ड पुणे 4) स्नेहा नितीन काळे रा. हडपसर पुणे ता.जि.पुणे 5) फरीन नाशिर खान रा. बिंबेवाडी नगर कोंढवा पुणे व इतर सहा जण नाव गाव माहीती नाही हे सर्व माझे जवळ येवून शिवीगाळ माराहण करुन माझे पत्र्याचे शेडमध्ये घुसुन पाडुन जाव ललीता विजय शिंदे नंदणी दिपक शिंदे, साक्षी सागर शिंदे यांचे सुध्दा घर पाडुन नुकसान करुन शिवीगाळ केली तसेच मामी हिराबाई रोहीदास काळे हिचे डावे पायाचे नडगीवर लोखंडी गज मारून जखमी करुन तुम्ही पारधी जास्त माजले आहात असे म्हणून जातीवाचक भाषा करुन तुमचेकडे पाहुन घेतो अशी धमकी दिली अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
आम्ही ज्या जागेत पत्र्याचे शेड करुन राहतो तेथे मुस्लिम समाजातील काही लोक येवुन आम्हास हि जागा आमची आहे ती मोकळी करा असे म्हणुन आम्हाला नेहमी दमदाटी करून जातात तसेच आम्ही सदर जागेमध्ये सुमारे दहा ते बारा वर्षापासुन राहत असल्याने सदर जागेबाबत माझे पतीरामदास यांनी जामखेड कोर्टात दावा दाखल केलेला आहे. तो न्याय प्रविष्ठ आहे.
आरोपी 1)वशीम महेबुब शेक 2) साद शहादुल शेख दोन्ही रा…कोंढवा पुणे ता.जि.पुणे 3) आयमा अब्बदुल शेख रा. मार्केट यार्ड पुणे 4) स्नेहा नितीन काळे रा. हडपसर पुणे ता.जि.पुणे 5) फ़रीन नाशिर खान रा. बिंबेवाडीनगर कोंढवा पुणे व इतर सहा जण असे एकूण अकरा जण माझे जवळ आले व मला म्हणाले की, ही तुम्ही जे राहतात ती शेडची जागा आमची आहे. ती जागा खाली करा असे म्हणुन मला दमदाटी करुन लाथाबुक्यानी मारहाण करण्यात सुरूवात केली.
तेव्हा माझी जाव ललीता विजय शिंदे हि भांडण सोडवत असता तिला पण शिवीगाळ दमदाटी करुन तीचे घराचे पत्रे उचकटुन फेकून दिले त्यानंतर आरडा ओरडा झाल्याच्या आवाज ऐकुन मामी हिराबाई रोहिदास काळे हिचे डावे पायाचे नडगीवर लोखंडी गज मारुन जखमी केले आहे. व पञ्याचे शेड काढून फेकून दिले तसेचआम्हाला म्हणाले की तुम्ही कुठल्या जातीचे आहेत. हे आम्हाला माहीती नाहीत. तुम्ही आमचे नादी लागले तर तुम्हाला येथे राहुन देणार नाही अशी धमकी दिली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.