Sunday, May 3, 2026
Home ताज्या बातम्या लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा कायापालट, हरित स्मशानभूमी करत दिला पर्यावरणाचा संदेश सेवानिवृत्ती नंतर...

लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा कायापालट, हरित स्मशानभूमी करत दिला पर्यावरणाचा संदेश सेवानिवृत्ती नंतर झाडांसाठी व पशू पक्षांना पाणवटे निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटणारे अवलिया राम मुरूमकर

0
2

जामखेड न्युज—–

लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा कायापालट, हरित स्मशानभूमी करत दिला पर्यावरणाचा संदेश

सेवानिवृत्ती नंतर झाडांसाठी व पशू पक्षांना पाणवटे निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटणारे अवलिया राम मुरूमकर

साकत येथे सेवानिवृत्त वन कर्मचारी राम मुरूमकर यांनी स्मशानभूमीत शेकडो झाडे लावून त्यांचे संवर्धन केले तसेच लोकसहभागातून संरक्षणासाठी कंपाऊंड केले यामुळे स्मशानभूमीचा कायापालट
केला आहे. सेवानिवृत्ती नंतर झाडांची लागवड त्यांचे संवर्धन करत पर्यावरण रक्षणाचा अनमोल सल्ला दिला आहे. तसेच उन्हाळ्यात पशू पक्षांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी गार सावली बरोबर पिण्याचे पाणी येथेच मिळावे म्हणून पाणवटे निर्माण केले यामुळे आज या परिसरात पक्षांचा किलबिलाट मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहे.

दरवर्षी 1 जानेवारी रोजी वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात येतो याच बरोबर नवीन वृक्षारोपण करण्यात येते. साकत येथील सामाजिक कार्यकर्ते राम मुरूमकर यांनी स्वतः च्या सेवानिवृत्ती निमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. तसेच या झाडांची स्वतः काळजी घेत दरवर्षी वाढदिवस व विविध सण समारंभ यानिमित्त वृक्षारोपण करतात. यामुळे स्मशानभूमी हरित झाली आहे.

आज स्मशानभूमी परिसरात सुमारे सातशे लहान मोठे झाडे झालेली आहेत. तसेच स्मशानभूमीची सुधारणा करण्याची संकल्पना भावकीपुढे ठेवली याला निस्वार्थी पणे करत असलेल्या कामाला खुप छान प्रतिसाद मिळाला आणि भावकीतून सुमारे पाच लाख रुपये लोकवर्गणी करून स्मशानभूमीचा कायापालट केला. स्मशानभूमीला तार कंपाऊंड केले व आतमध्ये वृक्षारोपण केले.

दलित वस्ती स्मशानभूमीचे काम हाती घेऊन तेथील लोकांचे मतपरिवर्तन करत याही स्मशानभूमीचा कायापालट केला कंपाऊंड करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

राम मुरूमकर स्मशानभूमीचा कायापालट करणारे अवलिया, राम मुरूमकर हे जानेवारी 21 मध्ये वनविभागातून सेवानिवृत्त झाले आणि त्याच दिवशी गावात वृक्षारोपण व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला यानुसार पाच लाख रुपये लोकसहभाग गोळा केला यातून कंपाऊंड तसेच परिसरात वड, पिंपळ, चिंच, आंबा, फुलझाडे लावली. या स्मशानभूमीचा कायापालट तर झालाच दलित वस्ती येथे असलेल्या स्मशानभूमीचा कायापालट केला यामुळे स्मशानभूमीचा कायापालट करणारा अवलिया राम मुरूमकर आहेत.

वृक्षारोपण करत परिसर हरित करून पर्यावरणाचा अनमोल संदेश देत पक्षांची पाण्यासाठी भटकंती थांबवून त्यांना गार सावली बरोबर थंड गार पाणी उपलब्ध झाले आहे यामुळे परिसरात पक्षांची किलबिलाट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!