Tuesday, April 28, 2026
Home राजकारण सुनील कर्जतकर यांच्या रूपाने जामखेडला मिळणार तिसरा आमदार

सुनील कर्जतकर यांच्या रूपाने जामखेडला मिळणार तिसरा आमदार

0
2

जामखेड न्युज—–

सुनील कर्जतकर यांच्या रूपाने जामखेडला मिळणार तिसरा आमदार

कर्जत-जामखेड मतदारसंघाला भारतीय जनता पक्षाकडून सुनील कर्जतकर (Sunil Karjatkar) यांच्या रूपाने तिसरा आमदार मिळणार आहे. भाजपाने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या नान्नज गावाससह तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते व मित्रमंडळी यांनी आनंदोत्सव साजरा केला.

कर्जत-जामखेड विधानसभेच्या राजकारणात सध्या रोहित पवार (विद्यमान आमदार – NCPSP) आणि राम शिंदे (भाजपा – विधानपरिषद सदस्य) आहेत आणि आता सुनील कर्जतकर यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. यामुळे आता जामखेड साठी तीन आमदार होणार आहेत.

सुनील कर्जतकर जामखेड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जामखेड तालुक्यातील नान्नज गावचे रहिवासी सुनील कर्जतकर यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्याने जामखेड तालुक्यात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

त्यांच्या रुपाने जामखेडला तिसरा आमदार मिळणार आहे. कर्जतकर १९९० साली जामखेड सोडले. यानंतर पुणे येथील भाजप कार्यालयात २४ तास ते काम करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कट्टर असल्याने पक्षाने त्यांना संघटनमंत्री म्हणून जबाबदारी दिली.रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते प्रदेश उपाध्यक्ष झाले होते.

भाजपमधील एक निष्ठावान कार्यकर्ते आणि पडद्यामागील रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी महानगरपालिका निवडणुका आणि विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, विशेषतः भाजपच्या निवडणूक सेलमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळेच त्यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीसाठी असे असेल मतांचे गणित विधानसभेतल्या आमदारांची संख्या 288 गुणिले 100 भागिले निवडणूक लागलेल्या 9 जागा आणि अधिक 1असे मिळून विधान परिषद निवडणुकीसाठी एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 29 मतांची गरज आहे.त्यानुसार महाविकास आघाडीकडे 49 संख्याबळ आहे,त्यामुळे त्यांचा एकच उमेदवार सहज निवडून जाईल. महायुतीचे संख्याबळ सध्या 234 इतके असून त्यांचेसहज 8 उमेदवार विधान परिषदेवर निवडून जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!