मयुर भोसले म्हणजे जामखेडचा कोहिनूर हिरा – ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे
माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मयुर भोसले यांचा सत्कार संपन्न
मयुर भोसले हे जामखेड परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असतात. त्यांनी आपल्या कामाने आपली ओळख निर्माण केली आहे. नुकतेच त्यांना एनसीसीमध्ये ‘सेकंड ऑफिसर’ पदी पदोन्नती मिळाली आहे. ते खरोखरच जामखेडचा कोहिनूर हिरा आहे असे मत ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय, जामखेड येथील राष्ट्रीय छात्र सेना(आर्मी)चे ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांना एनसीसीमध्ये ‘सेकंड ऑफिसर’ पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आज सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य रमेश अडसुळ, माजी मुख्याध्यापक पी. टी. गायकवाड, मुख्याध्यापक भरत लहाने, कॅप्टन गौतम केळकर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव संतोष पवार, प्रदिप टाफरे, पांडुराजे भोसले, अमोल भोंडवे, सुनिल घाडगे, पत्रकार अविनाश बोधले, पप्पू सय्यद, अनिल धोत्रे, बी. एस. शिंदे, संभाजी देशमुख, रणजित मोरे, अक्षय साखरे, अशोक पोटफोडे, आकाश घागरे, प्रफुल्ल सोळंकी, किरण रेडे, दीपक तुपेरे, अनिल पाटील यांच्या सह अनेक शिक्षक पदाधिकारी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवाजीराव ढाळे म्हणाले की, मयुर भोसले यांनी आपल्या कामामुळे जामखेड करांचा मान उंचावला आहे. तसेच माध्यमिक शिक्षक संघटनेच्या संपकालीन आंदोलनात मयुर भोसले यांची विविध उपक्रम राबवीत जिल्ह्याचे लक्ष वेधले ते सर्व गुण संपन्न आहेत.
यावेळी कॅप्टन गौतम केळकर, संतोष पवार, अमोल भोंडवे, प्रदिप टाफरे, पांडूराजे भोसले, भरत लहाने, पी. टी. गायकवाड, रमेश अडसुळ, यांनी आपले मनोगत व्यक्त करत मयुर भोसले यांच्या कार्याचा गुणगौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील घाडगे यांनी तर आभार माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी मानले.