बेसुमार वृक्षतोडीमुळेच सूर्य आग ओकतोय, उष्माघाताचे रूग्ण वाढतायेत, काळजी घ्या
एप्रिल महिन्यातील उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत, विदर्भातील अकोला (४६.९) सर्वाधिक उष्ण शहर म्हणून पुढे आले. दुसऱ्या क्रमांकावर विदर्भातीलच अमरावतीने स्थान मिळविले. याशिवाय मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही उष्णतेचा कहर दिसून येत आहे. यास बेसुमार वृक्षतोडच कारणीभूत असून, महाराष्ट्रात २०२१ ते २४ या तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ९.७ हजार हेक्टरवरील जंगलाचा -हास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
उष्माघात (Heat Stroke/Sunstroke) ही अति उष्णतेमुळे शरीराचे तापमान धोकादायकरित्या ४० अंश सेल्सिअस च्या वर जाण्याची जीवघेणी स्थिती आहे प्रखर उन्हात जास्त वेळ राहिल्याने किंवा शारीरिक श्रमामुळे शरीराची तापमान नियंत्रण यंत्रणा निकामी होते. यात कोरडी त्वचा, चक्कर येणे, मळमळ आणि बेशुद्ध पडणे ही प्रमुख लक्षणे दिसतात, ज्यावर तात्काळ वैद्यकीय उपचारांची गरज असते.
उष्माघाताची प्रमुख लक्षणे: शरीराचे उच्च तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान त्वचा कोरडी आणि गरम होणे: घाम येणे थांबणे (काही प्रकरणांमध्ये खूप घाम येऊ शकतो) मानसिक बदल: गोंधळ उडणे, बोलण्यात अडखळणे, चिडचिड होणे मळमळ आणि उलट्या: मळमळ होणे किंवा उलट्या होणे हृदयाचे वेगवान ठोके: नाडीचा वेग वाढणे तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येणे: डोके जड होणे किंवा चक्कर येऊन पडणे.
उष्माघाताची कारणे: प्रखर उन्हात राहणे: कडक उन्हात जास्त वेळ काम करणे किंवा फिरणे डिहायड्रेशन (निर्जलीकरण): शरीरात पाण्याची कमतरता होणे दाट हवामान: दमट हवेत शरीरातील उष्णता बाहेर पडू न शकणे
उष्माघात टाळण्यासाठी काय करावे? (प्रतिबंधात्मक उपाय) उन्हात बाहेर पडताना डोके, मान झाकून ठेवा (टोपी किंवा रुमाल वापरा) भरपूर पाणी, लिंबू पाणी, सरबत, नारळ पाणी प्या हलके, सुती आणि सैल कपडे वापरा दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात काम करणे टाळा
प्राथमिक उपचार: रुग्णाला त्वरित सावलीत किंवा थंड ठिकाणी न्या, अंगावरील जास्तीचे कपडे काढा, अंगावर थंड पाणी टाका किंवा ओल्या कपड्याने शरीर पुसा