सध्या राज्यात उष्णतेचा तडाखा बसू लागला आहे.उष्णतेच्या लाटेत उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज दुपारी जनावरांसाठी चारा काढत असताना उष्णतेचा त्रास होऊन शेतातच ४५ वर्षीय महिला हर्षदा रावसाहेब चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऊन्हाचा तडाखा बसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात उष्मघाता मुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या ढवळपुरीत उन्हाच्या तडाख्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पारनेर तुक्यातील ढवळपुरीत राहणाऱ्या हर्षदा याशेतात काम करत होत्या. दुपारच्या कडक उन्हात मका कापताना चक्कर येऊन ४५ वर्षीय हर्षदा कोसळल्याने त्यांचा उपचारा आधीच मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअसच्या वर असून अति उष्णतेमुळे आणि उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील रस्ते आणि वर्दळीचे ठिकाणी शुकशुकाट दिसतेय. थंड पेयाच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसतेय. अति उष्णतेमुळे उष्माघात थकवा जाणवणे असे प्रकार सुरू होत आहेत.
विविध जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वाधिक तापमानाच्या शहरात वर्धा दुसऱ्या क्रमांकवर पोहोचलं आहे. वर्धा जिल्ह्याचे आजचे तापमान 45°C इतके आहे.भारतात पहिल्या क्रमांकवर छतीसगड राज्याचे राजनांदगांव तर दुसऱ्यावर महाराष्ट्राचा वर्धा शहर पोहोचलं आहे.
आज आणि उद्या वर्धेला उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मागील एका आठवड्या पासून वर्धेचे तापमान 44 ते45 अंशच्या घरात आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिण्यात जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठले आहे. वाढते तापमान पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.