जामखेड महाविद्यालयाला उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार जाहीर
जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा “उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार” जामखेड महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा मानाचा पुरस्कार मिळवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष,मा.उद्धव (बापू ) देशमुख उपाध्यक्ष,मा.दिलीपशेठ गुगळे,सचिव मा.अरुण (काका) चिंतामणी खजिनदार मा. शरद देशमुख मा. शशिकांत देशमुख मा राजेश मोरे तसेच आजी-माजी संचालक मंडळ,
आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, सुनिल जी. पुराणे उपप्राचार्य,सुनिल वाय नरके प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व क्रीडा संचालक डॉ. आण्णा दि. मोहिते यांनी सातत्याने घेतलेल्या परिश्रमांचा मोठा वाटा आहे.
हा पुरस्कार मिळवण्यासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देत विद्यापीठ स्तरावर तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी घडवून आणली आहे. याच कार्याची दखल घेत हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील दर्जा अधिक उंचावला असून विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.
तसेच भविष्यातही अशाच प्रकारे उल्लेखनीय यश संपादन करण्याचा निर्धार संस्थेने व महाविद्यालयाने व्यक्त केला आहे. या यशाबद्दल सर्वत्र जामखेड महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे.